लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ व ऐतिहासिक दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले.
या प्रसंगी आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, मा आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक अरुणराव डोंगळे, प्रकाश पाटील, इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, विजय देवणे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, आदी उपस्थित होते.


Comments
Post a Comment