दैनिक राशिभविष्य

 दैनिक  राशिभविष्य

सोमवार, ३० जून २०२५.


 आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज वाढदिवस असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-


 आषाढ शुक्ल पंचमी. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


"आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे"  


चंद्रनक्षत्र - मघा/पूर्वा आज जन्मलेल्या बाळाची राशी -  सिंह. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी लाभ चंद्र आणि चंद्र युती मंगळ आहे. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सौख्य लाभेल. महत्वाची पदे मिळतील. मात्र संततीची चिंता वाटेल. 

       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामाजिक क्षेत्रात दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. अचानक आर्थिक लाभ होतील. गृह कलह होऊ शकतात. सामाजिक कार्यात आक्रमक भूमिका घ्याल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्या राशीत रवी आहे. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात भरभराट होईल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. सौख्य लाभेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. काही रेंगाळलेली कामे आज मार्गी लागतील. संपत्ती वाढेल. परिवारासोबत वेळ व्यतीत कराल. काही गोष्टी नव्याने समजतील.

    

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र मंगळाच्या युतीत आहे. कायदेशीर कामे पूर्ण होतील. सरकार दरबारी वजन वाढेल. मात्र कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. आधी खात्री करून घ्या. क्रोधाला यावर घाला.  

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यय स्थानी चंद्र - मंगळ युती आहे. वरिष्ठ खुश राहतील. मात्र सांभाळून पावले उचला. विनाकारण खर्च वाढू शकतात. इलेक्ट्रिक आणि गॅस वरील वाहन चालकांनी थोडी अधिक काळजी घ्यावी.   


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र, मंगळ अनुकूल आहे. सखोल आणि शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास मार्ग सापडेल. आर्थिक आवक चांगली राहील. प्रतिकूल हर्षल एखादा अनपेक्षित धक्का देऊ शकतो.

   

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अडचणी कमी होऊ लागतील. आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या बुद्धीचा आणि अधिकाराचा नोकरीच्या ठिकाणी योग्य वापर होईल. घरातील ज्येष्ठ  व्यक्तीशी मतभेद संभवतात.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सूर्याची दृष्टी तुम्हाला मार्ग दाखवेल. कोडी सुटू लागतील. शत्रू पीडा कमी होईल. राजकीय कामे पुढे सरकतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अष्टम स्थानी चंद्र मंगळ युती आहे. संमिश्र दिवस आहे. संयमाने काम करावे लागेल. जुने वाद उकरून काढले जातील. मात्र अंतिमतः यश तुम्हालाच मिळेल.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तम स्थानी चंद्र आणि मंगळ युती आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे नकोत. कोणाशीही शत्रुत्व घेऊ नका. गैरसमज टाळा. खर्चात वाढ होऊ शकते.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील सदस्यांचे मोल उमजू लागेल. षष्ठ स्थानी चंद्र मंगळ आहे. सोबत केतू देखील आहे. अनैतिक कामे करू नका. अन्यथा बलवान शत्रूचा त्रास होऊ शकतो.  


 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


३० जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ आहात. उत्साह भरपूरआहे. प्रवासाची आवड आहे. वडिलो पार्जित संपत्तीत तुम्हाला वाटा मिळतो. मुलांवर विशेष प्रेम असते. आपल्याला अज्ञात शक्ती लाभ व्हावेत आणि इतरांना आपण मदत करावी असे तुम्हाला नेहमी वाटते. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहेत. आयुष्यत तुम्हाला उशिराने प्रसिद्धी मिळते. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. तुम्ही अभ्यासू आहात व त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा करतात मात्र धर्माबद्दल तुम्हाला अभिमान आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुमचे बुद्धिकौशल्य तुम्ही कृतीमध्ये उतरवतात. इतरांसाठी कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकाराची हौस आहे. गूढ विद्यांची आवड आहे. विशेषत: तत्वज्ञान तुमच्या आवडीचा विषय आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. इतरांना तुमचा सहवास आवडतो. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही काळजीपूर्वक पावले टाकतात. शैक्षणिक क्षेत्र किंवा व्यवस्थापकीय क्षेत्र यात तुम्ही चमक दाखवतात. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. कृतिशील असलात तरी मनातून अस्वस्थ असतात. तुमच्यात महत्वकांक्षा आणि अभिमान आहे. धर्मादाय संस्था, मुकबधीर संस्था  यांसाठी विनामोबदला काम करण्याची आवड असते.  वयाच्या तीस यानंतर भाग्योदय होतो. तुम्ही समाजप्रिय असून तुम्हाला नाटक, सिनेमा, क्लब इत्यादींची आवड असते. कला आणि संगीतयांची आवड असून गृह सजावट करणे आवडते.  


व्यवसाय:-  राजकीय क्षेत्र, न्यायाधीश, डॉक्टर, केमिस्ट, शिक्षक, लेखक, सचिव.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.


शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, लसण्या, अमेथिस्ट.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments