दैनिक राशिभविष्य
मंगळवार, १५ जुलै २०२५
![]() |
| बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280 |
आणि १५ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये;-
. आषाढ कृष्ण पंचमी/षष्ठी. शके १९४७, संवत २०८१. ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र - शततारका/ पू. भा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा रवी शी त्रिकोण योग् तर मंगळाशी प्रति योग आहे. अनुकूल दिवस आहे. लेखक/प्रकाशक/पत्रकार यांच्यासाठी चांगला दिवस आहे. प्रगती साध्य होईल. व्यवसाय वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) ग्रहमान अनुकूल आहे. उच्च शिक्षण, दूरचे प्रवास यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा स्वभाव शांत आहे. इतरांना मदत कराल मात्र सामाजिक कार्यातून काहीसा त्रास होऊ शकतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीत स्थिरस्थावर होणास साहाय्यभूत ग्रहमान आहे. तुमचे अधिकार वाढतील. तुमच्या नेतृत्वाचा सन्मान होईल. प्रवास घडतील. भावंडांशी वाद संवभतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अष्टम स्थानी चंद्र आहे. त्यातच सूर्य व्यय स्थानी आहे. आज फारशी अनुकूलता नाही. जपून पावले टाका. कर्जदार असल्यास विशेष काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामांची पूर्तता योग्य वेळी करा. घशाची काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. अनुकूल राशीस्वामी रवी तुम्हाला आज मान, अधिकार आणि सन्मान प्राप्त करून देईन. तुमच्यातील आक्रमक स्वभावाला आज काहीशी वेसण घालावी लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. आर्थिक भरभराट होईल. कामाच्या ठिकाणी उत्तम अनुभव येतील. वरिष्ठ आज तुम्हाला विशेष सन्मान देतील. खर्च मात्र वाढणार आहेत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पाचवा चंद्र आहे. मंगळ अनुकूल आहे. प्रगती करणारा दिवस आहे. अधिकार वाढतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम काळावधी आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा तुम्हाला भक्कम पाठिंबा मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. सरकारी कामात प्रगती होईल. अष्टम रवीची नाराजी कमी होईल. अन्य मार्गाने आर्थिक लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढलेला असणार आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक आवक वाढेल. प्रगती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. सरकारी कामे आज पूर्ण करा. भागीदारी व्यवसायात उत्तम यश मिळेल. दीर्घकालीन शेअर्स मधून लाभ होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमानाचा लाभ उठवा. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कोर्ट कामात अनुकूलता वाढेल. शत्रू पराभूत होतील. वाहन अत्यंत जपून चालवा. यंत्र हाताळताना काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आज कामाचा उत्साह वाढेल. साचलेली कामे पूर्ण करा. छोटे प्रवास घडतील. विशेष अभ्यास करण्यास चांगला दिवस आहे. तुम्हाला संशोधन करण्याची आवड आहे. आज त्यात प्रगती होईल. प्रिय किंवा विश्वासू व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यय स्थानी चंद्र आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नाही. सामाजीक कार्यातून तुमचा नावलौकिक वाढेल. महत्वाच्या कामांसाठी वेळ पुरणार नाही. षष्ठ स्थानी मंगळ आहे. विनाकारण शत्रुत्व ओढवून घेऊ नका.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
१५ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला शांत असले तरी कधीही तडजोड करत नाहीत. तुम्ही अति महत्वाच्या पदांवर यशस्वी होतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असतो. तुम्ही अनाठायी काळजी करतात.घर, संसार मित्र यांचा बद्दल आपुलकीची नाती जोडली जातात. भाषणे, लेखन, रेडिओ कार्यक्रम यात तुम्ही रस घेतात. बढाईखोर पणा टाळला पाहिजे.
तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो. तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होणायची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत.
व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment