दैनिक राशिभविष्य
बुधवार, १६ जुलै २०२५
![]() |
| बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280 |
आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-
. आषाढ कृष्ण षष्ठी/सप्तमी. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१, वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज उत्तम दिवस आहे"
नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा हर्षलशी लाभ योग, शनिशी युती तर गुरुशी केंद्र योग आहे. संमिश्र ग्रहमान आहे. माफक यश मिळेल. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. लेखन आणि कोणताही लेखी करार करताना काळजी घ्या. अहंकार टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चंद्र अनुकूल आहे. अचानक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. कला प्रांतात चमक दाखवाल. कर्जे मंजूर होतील. जलपर्यटन घडेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढेल. कामाच्या ठिकाणी महत्वाचे बदल घडतील. त्याचा दीर्घकाळ लाभ मिळेल. मन धार्मिक बनेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल कालावधी आहे. अचानक धनलाभ होईल. मात्र बराच काळ जे खर्च तुम्ही टाळले ते आज करावे लागतील. मानसिक सौख्य लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. नोकरी/व्यवसायात माफक लाभ होतील. प्रतिष्ठेसाठी खर्च होईल. अनुकूल गुरू तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. मात्रआज मोठी जोखीम घेऊ नका.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज व्यवसायिक स्पर्धा जाणवेल. अर्थकारण मजबूत होईल. व्यवसायिक प्रगती साध्य होईल. नवीन खरेदी होईल. मन प्रसन्न राहील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूलता लाभेल. व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील. आरोग्यचे प्रश्न सुटतील. अष्टम हर्षल ची तीव्रता आज कमी होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शेअर्स व्यवहारात अधिक काळजी घ्यावी लागेल. दीर्घकालीन गुंतवणूक करा. पैशांची हाताळणी काळजीपूर्वक करा. वादविवादात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जमीन/ शेती यातून फायदा होईल. अडचणीतून मार्ग निघू लागतील. पाण्याची समस्या सुटेल. कारखानदार व्यक्तींना लाभ होतील. आरोग्य सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक लाभ होतील. नेहमीपेक्षा वेगळे उपाय तुम्ही कराल. नात्यात काहीसे मतभेद संभवतात. गूढ उलगडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल. समजाईक कार्यातून मोठे यश प्राप्त होईल. दीर्घकालीन नियोजन करा. संततीशी संवाद साधावा लागेल. शिक्षणात अपेक्षित यश मिळणार नाही. कमी बोलणे हिताचे आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ होतील. आत्मचिंतन करण्यास चांगला दिवस आहे. कुटुंबाबद्दल काळजी वाटेल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
१६ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव परोपकारी आणि मिश्किल आहे. शांत दिसत असले तरी मनामध्ये घालमेल चालू असते.तुम्ही सतत कार्यमग्न असतात. संतती चांगली होते. तुमचा स्वभाव नम्र असतो. तुम्ही सतत सावध असतात. सूक्ष्म बाबीचे तुम्हाला आकर्षण असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून असू शकते. आरोग्याच्या तक्रारी चालू असतात. वागण्यात विरोधाभास असू शकतो.
तुमची बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असते. इच्छाशक्ती असल्यास तुम्ही जीवनात मोठे यश कमवतात. तुम्ही चाकोरी बाहेरचा विचार करतात. तुम्ही भावनाप्रधान असून कलेची आवड असते. दूरच्या प्रदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते आणि त्यामुळे तुमचा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही पक्षाप्रमाणे स्वैर असतात. भविष्य आणि तत्वज्ञान यात तुम्हाला गती असते. विचार तर्कशुद्ध असतात. सर्व साधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे आवडत नाही. जीवनात सतत बदल आवडतो. बऱ्याच वेळ तुम्ही विचार मग्न असतात. पुस्तकात रमणे तुम्हाला प्रिय असते. तुम्ही मनाने मोकळे असतात आणि परंपरा स्वीकारतात. इतरांना तुमच्या पासून स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- आयात - निर्यात, दुग्ध, मत्स्य, रसायने, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- हिरवा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


Comments
Post a Comment