विकास विद्यामंदिरमध्ये 'विविध शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन व गणवेश वितरण' संयुक्त कार्यक्रम साजरा

 


विकास विद्यामंदिरमध्ये 'विविध शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन व गणवेश वितरण' संयुक्त कार्यक्रम साजरा



कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क 

             विकास विद्यामंदिर,कोल्हापूरमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन व विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले.महाराष्ट्र शिक्षण मंडळ,कोल्हापूर या संस्थेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.मान्यवरांचे स्वागत कोल्हापूरच्या शिक्षणक्रांतीचे प्रणेते 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांचे चरित्र(पुस्तक)देऊन झाले.

            संस्थेचे खजानीस मा.पापालाल नायकवडी (सर) यांच्या शुभहस्ते LCD प्रोजेक्टरद्वारे 'ई-लर्निंग'चा शुभारंभ करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी परिपूर्ण वर्गांतील 'वाचन कोपऱ्यां'चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अतुल दिघे(सर) यांच्या शुभहस्ते पार पडले.'व्हाईट बोर्ड्स'द्वारे आधुनिक पद्धतीने अध्यापनाची सुरुवात पदाधिकारी मा.डॉ. दिलीपकुमार रणदिवे यांच्या शुभहस्ते झाली.

          डिजिटल शिक्षणासाठी सर्व वर्गांमध्ये बसवलेल्या 'स्मार्ट टीव्ही प्रकल्पा'चा शुभारंभ मा.श्री.विवेक पाटील (सर) यांच्या शुभहस्ते झाला.अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन संस्थेचे सहचिटणीस मा.एस.जी.भिलगुडे (सर) यांच्या शुभहस्ते पार पडले.नूतनीकरण केलेल्या सुसज्ज 'विज्ञान प्रयोगशाळे'चे उद्घाटन नूतन आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. कुसुम भोसले (मॅडम) यांनी केले.

           

             याप्रसंगी ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक मा.प्रा. नारायण निळपणकर (सर) यांनी व विकास विद्यामंदिर,कोल्हापूरच्या मुख्याध्यापिका मा.सौ.इंदिरा कांबळे (मॅडम) यांनी मनोगते व्यक्त केली.संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाने सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. 

             मा.रणजीतसिंह बाबूराव निंबाळकर (सर) व मा.कुसुम भोसले (मॅडम) यांच्या आर्थिक सहयोगातून विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गणवेश प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तानाजी कवडे (सर) यांनी केले तर आभार श्री.वैभव प्रधान (सर) यांनी मानले.याप्रसंगी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी,शिक्षक/शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.



Comments