दैनिक राशिभविष्य
बुधवार, २३ जुलै २०२५
![]() |
| बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280 |
आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
. आषाढ कृष्ण चतुर्दशी. शके १९४७, संवत २०८१, विश्वावसु नाम संवत्सर. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज वर्ज्य दिवस आहे" *शिवरात्री* संत सावता माळी पुण्यतिथी.
नक्षत्र - आर्द्रा/ (संध्याकाळी ५.५५ नंतर) पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. (व्याघात/हर्षण योग, विष्टी आणि शकुनी करण शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र मंगळ लाभ योग आहे. गुरूशी चंद्राचा युती योग आहे. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. प्रश्न सुटतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. मनासारखी कामे होतील. दबदबा वाढेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी उत्तम अनुभव येईल. वाहन सुख लाभेल. अनेक दिवस बाकी राहिलेली घरगुती कामे आज पूर्ण होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आणि गुरू आहेत. आज त्यांची युती आहे. आत्म विश्वास वाढेल. आवडती वस्तू खरेदी कराल. मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील. आर्थिक बाजू भक्कम राहील. भावंड मदत करतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होणार आहे. आध्यत्मिक लाभ होतील. सिद्धी प्राप्त होतील. दानधर्म कराल. अंध, वृद्ध आणि अपंग यांची सेवा कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चंद्र अनुकूल आहे. प्रगतीची घोडदौड चालू राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल. सामाजिक महत्व वाढेल. मौल्यवान वस्तूचे सुख मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. व्यवसायात भरघोस वाढ होईल. नोकरीत दबदबा वाढेल. कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील. खर्च वाढेल मात्र तो योग्य कारणासाठी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. धन धान्य वाढेल. खरेदी होईल. सहकाऱ्यांमार्फत लाभ होतील. व्यवसाय वाढेल. दूरचे प्रवास घडतील. धर्म कार्य घडेल. भाग्योदय होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. महत्वाच्या व्यक्तीची भेट होईल. प्रवास घडतील. काळजीपूर्वक पावले टाका. अधिकार वाढतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. अर्थकारण मजबूत होईल. हाती घेतलेले काम तडीस न्याल. पश्चिम दिशेकडे प्रयाण केल्यास उत्तम यश मिळेल. सिद्धी प्राप्त होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. येणी वसूल होतील. आर्थिक चिंता मिटतील. कौटुंबिक सुख लाभेल. जुन्या प्रश्नांवर मार्ग सापडेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये चांगला नफा प्राप्त होईल. संतती बाबत शुभ समाचार समजतील. आध्यत्मिक ज्ञान प्राप्त होईल. शत्रू माघार घेतील. कोर्टात तुमच्या बाजूने न्याय होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. नवीन कराराची बोलणी यशस्वी होतील मात्र प्रत्यक्ष कामास वेळ लागेल. जमीन व्यवहारातू लाभ होतील. स्वतःची वास्तू होण्यासाठी चांगला कालावधी आहे.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
२३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला जीवनात यश मिळते व मानमरातब आणि संपत्ती याचा लाभ होतो. स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे तुम्हाला आवडते. भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुम्ही प्रेमळ असून स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. तुमच्याजवळ चांगले शब्द भंडार आहे त्यामुळे लेखन भाषण देणे आणि शिकवणे याच्यात तुम्ही यशस्वी होतात. तुम्हाला सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात. इतरांच्या बाबत व परिस्थितीबाबत तुम्ही अतिशय संवेदनशील असून परिस्थितीचा ही तुमच्यावर फार मोठा परिणाम होतो. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगण्याची तुम्हाला आवड असते. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याची पूर्व नियोजित योजना तुम्ही तयार करतात. बौद्धिक गोष्टींचे तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. नाविन्य आणि प्रवासाची आवड ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. जे पीडित लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुमची स्मरणशक्ती चांगली असून आप्त जन तुम्हाला प्रिय असतात. विरुद्ध बाजूच्या व्यक्तीची क्षमता तुम्ही जाणू शकतात त्यामुळे त्याच्यातील न्यूनतेचा फायदा तुम्ही उठवू शकतात. तुमच्यात भाषा चातुर्य असते. तुम्ही मनाने कमकुवत असल्याने अस्वस्थ असतात. तुम्हाला आपल्या आवाजाची देणगी असते. तुमची बहुतेक सुखे मानसिक पातळीवर असतात आणि त्यांना व्यावहारिक पातळीवर आणण्याचा तुमचा दृष्टिकोन असतो. सहकार्य आणि समाजप्रियता ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणे असतो. दुसऱ्याला न दुखावण्याचा स्वभाव तुमचा असतो. आणि तुम्ही सहकार्य करतात. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. स्त्रियांमध्ये सुखी वैवाहिक जीवन दर्शवते. लहान वयात एखादे प्रेम प्रकरण असू शकते. तुम्ही कृतिशील असून तुमच्यात भाषण चातुर्य आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला जुगारी वृत्ती किंवा कोडे सोडवण्याचा छंद असू शकतो.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


Comments
Post a Comment