दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

गुरूवार, २४ जुलै २०२५. 



शेवटी  आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिट्ये:


- आषाढ अमावस्या. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज वर्ज्य दिवस आहे" *दर्श अमावस्या* दीप पूजन, गुरूपुष्यामृत.


चंद्र नक्षत्र - पुनर्वसू/ (दुपारी ४.४४ नंतर ) पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन/ (सकाळी १०.५९ नंतर) कर्क. (हर्षण, वज्र योग, चतुष्पाद, नाग करण शांती)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनी, हर्षल आणि नेपच्यूनशी शुभ योग आहे. सकाळी ११.०० नंतर अनुकूल कालावधी आहे.  व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. धर्म कार्य कराल. अचानक धनलाभ होईल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. अचानक एखादा मोठा खर्च सामोरा येऊ शकतो. व्यवसाय वाढीसाठी पोषक ग्रहमान आहे. कामाचा ताण वाढेल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. सांपत्तिक वाद उदभवतील. कामाच्या ठिकाणी मात्र सुखद अनुभव येतील. मनासारखे सहकार्य मिळेल. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज तुमच्याच राशीत अमावस्या आहे. काही सुखद अनुभव येतील. लाभ वाढतील. मात्र वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीत वेळ वाया जाईल. खर्चात वाढ होऊ शकते. तीर्थाटन होईल. 


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी अमावस्या आहे. सकाळच्या सत्रात अर्थप्राप्ती होईल. कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा. नंतरचे दोन दिवस हानी करणारे असू शकतात. खर्च वाढतील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या कडून अपेक्षा वाढतील. संध्याकाळ आनंदाची. मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील. चंद्र आणि रवी अनुकूल आहेत. सन्मान मिळतील. 

 


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) स्थावर संपत्ती बाबत काही मार्ग निघू शकतात.  व्यावसायिक जागेत बदल संभवतो. विजयश्री खेचून आणाल. वरिष्ठ खुश होतील. नोकरीत शाबासकी मिळेल. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. शौर्य दाखवण्याची वेळ नाही. अनैतिक कामे टाळा. प्रवासाचे नियोजन बदलेल. शेअर्समध्ये तुमचे अंदाज अचूक येतील. अंतर दीर्घकालीन गुंतवणूक करा. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. महत्वाची निर्णय आज नकोत. तुमच्या अष्टम स्थानी अमावस्या आहे. उधारी वाढेल. आर्थिक चिंता सतावतील. शेजारी, भाडेकरू यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल.

   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. शत्रू मात्र आज शिरजोर होणार आहे. कोर्ट कामात अपेक्षित निर्णय येणार नाही. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) षष्ठ स्थानी अमावस्या आहे. संमिश्र दिवस आहे. व्यवसायिक लाभ होतील. तुमचा नावलौकिक वाढेल. कनिष्ठ दर्जाची कामे करावी लागतील. वक्तृत्व गाजेल. सांपत्तिक स्थिती चांगली राहणार आहे.   

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील. मात्र नियोजन बदलेल. छोटे प्रवास घडतील. शेअर्स मधून उत्तम लाभ होतील.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

२४ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात तुम्ही अंतर ठेवतात. गरीब, अपंग व्यक्तीसाठी तुम्ही संस्था काढतात किंव आर्थिक मदत करतात. तुमचा स्वभाव अस्थिर असू शकतो आई वागण्यात विरोधाभास असू शकतो. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि लग्नानंतर भाग्योदय होतो. तुम्हाला शिकणे आणि शिकवणे आवडते.   


     तुम्ही दिसायला शांत असले तरी कधीही तडजोड करत नाहीत. तुम्ही अति महत्वाच्या पदांवर यशस्वी होतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असतो. तुम्ही अनाठायी काळजी करतात.घर, संसार मित्र यांचा बद्दल आपुलकीची नाती जोडली जातात. भाषणे, लेखन, रेडिओ कार्यक्रम यात तुम्ही रस घेतात. 


     तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो.  तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होणायची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत. 


व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.


शुभ रंग:- निळा, गुलाबी.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments