दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

शनिवार, २६ जुलै २०२५







आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-

 . श्रावण शुक्ल द्वितीया/तृतीया. विश्वावसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज व्यतिपात वर्ज्य दिवस आहे" *दर शनिवारी नरसिंह -पिंपळ- शनी -मारुती पूजन करावे.*   


नक्षत्र: आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क/सिंह (व्यतिपात योग, नक्षत्र गंडांत) *विषकन्या योग*


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी लाभ योग तर हर्षल शी केंद्र योग आहे. अनुकूल दिवस आहे. प्रणय रम्य कालावधी आहे. व्यावसायिक यश मिळेल. संपत्ती वाढेल. प्रेमात यश मिळेल. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) तृतीय आणि चतुर्थ स्थानी चंद्र आहे. कलाकारांना उत्तम दिवस आहे. सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. मात्र आज तुम्हींऊ एखादा विचित्र निर्णय घेऊ शकतात.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. महिलांकडून सहकार्य  मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. मात्र चुकीच्या  निर्णयाचा फटका बसू शकतो. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत सकाळी चंद्रआहे. व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. स्वतःचं सुखासाठी आणि चैनीसाठी खर्च कराल. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुरुवातीला व्यय स्थानी चंद्र आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. खर्च वाढतील. आध्यत्मिक लाभ होतील. संध्याकाळ आनंदाची आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी मात्र तणाव जाणवेल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळी लाभ स्थानी चंद्र आहे. अत्यंत चांगले अनुभव येतील. व्यावसायिक कामात प्रगती होईल. नोकरीत सुखद मिळतील. प्रवासात त्रास संभवतो. महिलांना चांगला दिवस आहे. 


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. आज सुखद अनुभव येतील. कामाचा ताण कमी होऊ शकतो. हातून चांगले कर्म घडेल. वाहन सुख लाभेल. लॉटरीतून लाभ होऊ शकतात. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत आज उत्तम दिवस आहे.  कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. ,राहिला सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. सासुरवाडीहून मदत मिळेल. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. पारिवारिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. हरवलेल्या वस्तू सापडतील. व्यसने टाळा. संध्याकाळ अत्यंत आनंदात व्यतीत कराल. मात्र आरोग्याची काळजी घ्या.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. सरकारी पदे मिळतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. व्यसने आणि प्रलोभने येतील. कोणतेही आर्थिक धाडस आज करू नका.  

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. रोजच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमात यश मिळेल. दिवस आनंदात व्यतीत कराल. घरात मात्र कटकटी होऊ शकतात.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे.  विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. गुंतवणूक चांगला परतावा देईन. घरात काही महत्वाचे बदल कराल. सार्वजनिक ठिकाणी लेखन करताना कळजी घ्या.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

२६ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये:-


      तुमच्यावर शनि आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात. चांगले दिसण्याकडे कल असतो. स्वतःच्या घराबद्दल आणि प्रियजनांबद्दल ओढ असते. मोठ्या महत्वाकांक्षी योजना पार पाडण्यात तुम्हाला आनंद वाटतो. तुमच्यात दांडगा उत्साह असतो. तुम्हाला भावना व्यक्त करता येत नाहीत. तुम्ही मनाने चंचल असून वृत्ती अस्थिर असते. फार कष्ट न करता आयुष्याचा उपभोग घ्यावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. तुम्ही शांतताप्रिय असून लोक कल्याणाकरिता प्रयत्न करतात. गूढ विद्यांबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही बुद्धिमान,धाडसी, प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहात. संशोधन आणि ज्ञान यांची तुम्हाला आवड असते. स्वतःच्या कल्पनेतून आणि विचारांतून तुम्हाला यश मिळते. तुम्ही समतोल स्वभावाचे असून दोन्ही बाजूंचा विचार करणारे आहात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना तुम्ही समांतर विचार करतात. तुम्ही कडक शिस्तीचे आहात. तुम्ही निश्चयी आणि कर्तव्य तत्पर आहात. तुम्हाला एकांतात राहणे आवडते. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दलचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतात तसेच बहुतेक गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करतात. तुम्ही कधीही अतिउत्साही नसतात. थोडेफार उदास असतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तुमची तयारी असते. तुम्ही महत्त्वाकांक्षी आणि दीर्घोउद्योगी असतात. कधी कधी तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि योग्य गोष्टींबद्दल तुम्हाला आदर असतो. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. तुम्ही धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तुमच्याकडे अधिकार आणि जोम भरपूर आहे. व्यवहारीक गोष्ट तुम्ही सुलभपणे हाताळतत्. तुम्ही इतरांच्या अनावश्यक जबाबदाऱ्या उगाचच खांद्यावर घेतात. कधीकधी जीवनात तुम्हाला नैराश्य येते. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये मिसळले पाहिजेत. काही वेळा तुमच्यातील भित्रेपणा तुम्हाला धक्का देऊ शकतो. इतरांवर वर्चस्व गाजवणे तुम्हाला आवडते. 



व्यवसाय:- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, लाकूड, कोळसा, लोखंड संबंधित व्यवसाय. व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी. नोकरी आणि  व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.


शुभ अंक:- एक, तीन, आठ.


शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.


शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती किंवा काळा हिरा. 

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments