दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २९ जुलै २०२५.
आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
श्रावण शुक्ल पंचमी. वर्षा ऋतू. विश्ववसुनाम संवत्सर. शके१९४७, संवत २०८१. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र - उत्तरा/हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.
"आज चांगला दिवस आहे. *नागपंचमी* शुक्ल यजुर्वेद श्रावणी. मंगळागौरी पूजन.
मेष:- तसे तुम्ही कमी आणि मोजके बोलणारे आहात. पण आज तुमचे वक्तृत्व चमकेल. शब्दाला मान मिळेल. सामाजिक कार्यात अग्रेसर रहाल. शेतीतून आणि जमीन विक्रीतून लाभ मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जुनाट दुखणे आज डोके वर काढतील.
वृषभ:- आज प्रगतीचा दिवस आहे. गुंतवणूक करण्यासाठी चांगला कालावधी आहे. शेअर्स मध्ये लाभ मिळतील. तरुण युवतींनी प्रलोभनाला बळी पडू नये. संयम ठेवावा लागेल.
मिथुन:- तुमचा स्वभाव संवेदनशील आहे. भरपूर गप्पा आणि मिश्किल स्वभाव ही तुमची वैशिष्टये आहेत. स्थावर संपत्ती बद्दल काहीतरी मार्ग निघणार आहे. कामाच्या ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. मात्र मन प्रफुल्लित राहणार आहे. भावंडमात्र नाराज राहतील.
कर्क:- अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसाय वाढीसाठी चांगला कालावधी आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. बुद्धीचे तेज तुमच्या वागण्यातून दिसणार आहे. तुमचा स्वभाव प्रेमळ आणि धार्मिक आहे. आज देवदर्शनासाठी योग्य वेळ द्याल. नात्यातून लाभ होतील.
सिंह:- राशीस्वामी नाराज आहेत मात्र तरीही बाकी ग्रहमान अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात यश लाभेल. आर्थिक लाभ होतील. उत्साह वाढवणार्या घटना घडतील. महिलांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. आत्मविश्वास काहीसा कमी होईल. आरोग्य सांभाळावे लागेल.
कन्या:- आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. सोबत मंगळ आहे. तुमचा दबदबा वाढणार आहे. महत्वाची कामे पूर्ण होतील. कामाची गती वाढेल. कर्जे वसूल होतील. भागीदारी व्यवसायात संयम ठेवावा लागेल.
तुळ:- सध्या फारशी अनुकूलता नाही. सावधपणे वाटचाल करावी. नोकरीच्या ठिकाणी सुखद प्रसंग घडतील. वरिष्ठ खुश राहतील. चंद्र हर्षल शुभ योगाचा फारसा उपयोग होणार नाही. स्त्री धन वाढेल. जुनाट दुखणे डोके वर काढू शकते. पाण्यापासून काळजी घ्या.
वृश्चिक:- आज चंद्र अनुकूल आहे. अनेक लाभ मिळतील. तुमच्या मूळच्या मेहनती स्वभावाला अनुसरून तुम्ही खूप काम कराल. त्यातून यश मिळेल. राजकीय क्षेत्रात प्रगती होईल.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीच्या ठिकाणी कामात सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीकडून भ्रम निरास होऊ शकतो. सरकारी कामे पूर्ण करून घ्या. विहीर, पाणी यांपासून आज विशेष काळजी घ्या.
मकर:- नवम स्थानी चंद्र आहे. आर्थिक प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. पैशांचे प्रश्न सुटतील. सहकार्य मिळणार आहे. शेअर्स मध्ये लाभ होतील.
कुंभ:- अष्टम स्थानी चंद्र मंगळ आहेत. फारशी अनुकूलता नाही. भलते धाडस नको. वाहन चालवताना काळजी घ्या. घरगुती काम करताना हरवलेली वस्तू सापडेल. प्रिय व्यक्तीची नाराजी ओढवून घ्याल.
मीन:- सप्तम स्थानी चंद्र आहे. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. नवीन संधी चालून येतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
२९ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चंद्र नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही लहरी असल्याने तुमच्या कृतीमध्ये अनिश्चितता असते. तुमच्यात धैर्य व धीटपणा असतो. आयुष्यात कोणताही धोका पत्करायची तयारी असते पण चिकाटी नसते. आर्थिक लाभावर दृष्टी असते. संसारात मतभेद असू शकतात. तुमचे आयुष्य उलाढालीचे असते. जीवनामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचे त्याबद्दल तुम्ही खूप मोठमोठी स्वप्न रंगवता. प्रत्येक कामाबद्दल उत्साही असतात. क्वचित प्रसंगी इतरांनी आपल्या मताचे अनुकरण करावे अशी अपेक्षा करता. ज्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल असे प्रसंग तुम्ही स्वतःच निर्माण करता व त्यामध्ये तुम्ही नायिकेची भूमिका बजावता. जीवनामध्ये त्याच त्याच गोष्टी करायला तुम्हाला आवडत नाही. स्वतःच्या स्वप्नामध्ये रंगण्यात अधिक आनंद मिळतो. त्यामुळे बऱ्याच वेळा एककल्ली जिवन जगता. तुमच्यातल्या उदारपणामुळे इतरांना तुम्ही प्रिय असतात. बराच वेळा इतरांना नाराज करणे तुम्हाला कठीण जाते. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही उत्तम तऱ्हेने प्रत्यक्षात रूपांतर करता. रम्य विषयाशी समरस होण्याची वृत्ती असते. निसर्गसौंदर्य, समुद्र वगैरे गोष्टींशी एकरूप होणे तुम्हाला प्रिय असते. आकाशाकडे किंवा समुद्राच्या लाटांकडे बघायला फार आवडते. काही प्रमाणात भित्रा स्वभाव असून तुम्ही दुसऱ्यांच्या दबावाला बळी पडतात. तुम्ही अतिशय अस्वस्थ असून सतत बदल करण्याची आवड असते. आळशीपणा असतो त्यामुळे श्रम करण्याची क्षमता कमी असते. अस्थिर स्वभावामुळे सांपत्तिक स्थैर्य सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे उतार वयात आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागते. बचतीकडे लक्ष देणे आणि आर्थिक बाजू बळकट करणे गरजेचे आहे. महिला :- तुम्ही अतिशय प्रेमळ व निष्ठावान असतात. दुसऱ्यांबद्दल आदर व आपुलकी असते. पतीकडून फारशी अपेक्षा नसते, जे मिळेल त्यात तुम्ही सुखी समाधानी असतात. तुम्ही उत्तम असून मुलांमध्ये व संसारात रमता. तुमच्या अस्तित्वामुळे घरामध्ये आनंदाचे व समाधान त्यांचे वातावरण असते. तुम्हाला अंतःस्फूर्तीची देणगी असल्याने काही वेळेला पतीलाही त्याच्या व्यवसायात मार्गदर्शन करतात. वरील गुण तुमच्यामध्ये असूनही एक दुसरी बाजू ही असेल की तुम्ही अतिशय चंचल, चमत्कारिक व अस्वस्थ स्वभावाचे प्रदर्शन करता, त्यामुळे इतरांना त्याचा फार त्रास होतो. काही वेळेला बरोबरीचा किंवा वयाने लहान पती निवडता.
शुभ रंग:- पांढरा, निळा किंवा क्रीम
शुभ दिवस:- सोमवार ,गुरुवार शुक्रवार
शुभ रत्न :- मोती, हिरा चंद्रमणी किंवा गोमेद.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

Comments
Post a Comment