ओला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आले नसल्याने मनसेने केले कोल्हापुरातील शोरूम बंद
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
इलेक्ट्रिक स्कूटर मधले नावाजलेले नाव असलेले ओला कंपनी. ओला कंपनीबद्दल ग्राहकांमध्ये गेल्या काही दिवसापासून असंतोष निर्माण झाला आहे . विक्रीनंतर मिळणाऱ्या सेवा आणि त्याला होणारा अवधी यात कमालीचा तफावत निर्माण झाला आहे .त्यामुळे ग्राहकांना त्यांना त्यांच्या स्कूटर वेळेवर मिळू शकत नाही .त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाली आहे त्याचेच पर्यवसान म्हणून मनसेने गेल्या काही दिवसांपासून ओला कंपनीच्या असणाऱ्या जिल्ह्यातील शोरूम बंद करण्याचा धडाका लावला आहे त्यानंतर त्यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी शुक्ला यांच्याशी संवाद साधला असता.
येत्या दोन चार दिवसात कोल्हापुरात येऊन ग्राहकांना होणाऱ्या अडचणी बद्दल सोक्षमोक्ष लावण्याचा लावण्याचा निर्धार केला. पण ओला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी काही कारणास्तव कोल्हापूर येऊ शकले नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे येण्याचे टाळले आहे हेच कारण म्हणून आज मनसेने उद्यम नगरातील ओलाचे सर्विस सेंटर बंद पडले. जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ कोल्हापुरात येत नाहीत तोपर्यंत शोरूम सुरू होणार नसल्याचे सांगितले जर याबाबत काही निर्णय झाला नाही तर मनसेचा पद्धतीने कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम ही मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी मनसेचे राजू जाधव आणि त्यांचे सहकारी, असंतुष्ट ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Comments
Post a Comment