दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २२ जुलै २०२५
आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
. आषाढ कृष्ण द्वादशी/त्रयोदशी. वर्षा ऋतू. विश्ववसुनाम संवत्सर. शके१९४७, संवत २०८१. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र - मृग/आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ/मिथुन. (ध्रुव योग शांती)
"आज क्षय तिथी आहे. *भौम प्रदोष,* संत नामदेव समाधी सोहळा.
मेष:- चंद्राचा शनी आणि नेपच्यून शी केंद्र योग आहे. फारशी अनुकूलता नाही. जपून पावले टाका. एखाद्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. अहंकार टाळा. श्री. हनुमान उपासना करा. गरम पाण्यापासून काळजी घ्या.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. आत्मविश्वास वाढेल. सांपत्तिक वाद वाढू देऊ नका. झोपण्याच्या जागी विशेष काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.
मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. सकाळी व्यय स्थानी आणि नंतर तुमच्याच राशीत चंद्र आहे. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतील. आज मोठे निर्णय घेऊ नका. पावसाचा आणि पाण्याचा अंदाज घ्या.
कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. मन आनंदी राहील. भविष्यातील यशाची बीजे रोवली जातील. ज्येष्ठ व्यक्तींनी काळजी घ्यावी. आज जलपर्यटन टाळावे. महिलांना नात्यातून वादविवादाचा अनुभव येऊ शकतो.
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात यश लाभेल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. मात्र आज एखादी अप्रिय किंवा पीडादायक बातमी येऊ शकते. नदी जवळ किंवा पाणथळ जागेजवळ काळजी घ्या.
कन्या:- आज तुमचा दबदबा वाढणार आहे. सरकारी कामे पूर्ण होतील. कामाची गती वाढेल. कर्जे मंजूर होतील. फार आक्रमक राहू नका. प्रतिस्पर्ध्याला कमी मानू नका.
तुळ:- अष्टम आणि नवम स्थानी चंद्र आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. संपत्ती वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. महिलांनी एकटे फिरताना कळजी घ्या.
वृश्चिक:- आज फारशी अनुकूलता लाभणार नाही. तुमचा देवावर फारसा विश्वास नसला तरी आज दैवी उपासना करावी. कारण मन अस्वस्थ असणार आहे. संततीची काळजी वाटेल. प्रवास घडतील. कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. मात्र विहीर, पाणी यांपासून आज विशेष काळजी घ्या. नेहमीच्या कामात जागेत बदल संभवतो. औषधे घेताना दक्षता घ्या.
मकर:- षष्ठ स्थानी दिवसभर चंद्र असणार आहे. प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. मात्र प्रवासात त्रास होऊ शकतो. वाहन जपून चालवा. निराश करणारे विचार मनात येऊ शकतात. लवकरच सर्वकाही ठीक होईल.
कुंभ:- चतुर्थ आणि पंचम स्थानी चंद्र आहे. घरगुती कामे आज पूर्ण होतील. उच्च शिक्षणात यश लाभेल. मनाला संभ्रमित करणाऱ्या घटना घडतील. घशाची काळजी घ्यावी लागेल.
मीन:- आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमच्याच राशीत शनी आणि नेपच्यून आहेत. तुमच्या वागणुकीचा इतरांना त्रास होऊ शकतो. महत्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या. चुका होऊ शकतात.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
२२ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या आयुष्यात मोठ्या जबाबदारीची कामे मिळतात. कौटुंबिक जीवन सुखाचे असते. मित्र परिवार अतिशय छोटा असतो. भांडण्याची फिकीर करीत नाही. भावनेची काटकसर करता. बऱ्याच वेळा एकटेपणा जाणवतो. आयुष्यातील ४० ते ६० वर्ष महत्त्वाचे असून यशाच्या सर्वोच्च काळ असतो. भिन्नलिंगी व्यक्ती पासून फायदा होतो. हर्षल व मंगळ या ग्रहांच्या मुळे बऱ्याच वेळा तुमच्या जीवनात विचारात विरोधाभास असतो. हर्षल हा स्फोटक ग्रह असल्यामुळे जीवनात बरेच चढउतार होण्याची शक्यता असते. अनपेक्षित गोष्टी, विलक्षण गोष्टी होतात. कर्तुत्व असूनही विलक्षण घटना घडतात. व्यवसायात अनेक बदल होतात त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. उत्साह, प्रगती,जोम ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मनाची पातळी खूप उच्च दर्जाची असते. मानवाच्या कल्याणासाठी बुद्धीचा व कृतीचा उपयोग करतात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते खोटेपणा तुम्हाला आवडत नाही. तुमच्या स्वभाव परखड असून दुसऱ्याचे विचार तुम्हाला सहजा सहजी पटत नाही. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे इतर लोक दुखावले जातात व निष्कारण गैरसमज व शत्रुत्व निर्माण होते. तुमच्या कामात कोणाची ढवळाढवळ तुम्हाला आवडत नाही, जर अशी ढवळढवळ कोणी केली तर तुम्ही तुमचे काम सोडून बाहेर पडतात. डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात यश मिळते. पण हट्टीपणा आणि उद्धटपणा यामुळे अडचणी येऊ शकतात. वृत्तीने निर्भीड असून कोणत्याही धोक्यास तोंड देण्यात तुम्ही तयार असतात. जीवनात सतत बदल असावा असे तुम्हाला वाटते. घरातील व कौटुंबिक संबंधातून व नातेवाईकांपासून तुम्हाला त्रास होतो. आयुष्यात अनेक अडचणी आणि विलंब असूनही पैशाच्या बाबतीत तुम्ही समाधानी असतात. तुम्ही तल्लख व आकर्षक आहात. तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा चांगल्या कपड्यांचे शौकिन असतात. महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होता. आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात. घरातील सजावट उत्तम असावी असे तुम्हाला वाटते. बऱ्याच वेळा स्वतःचा वरचढपणा दाखवण्याची लहर येते. काही वेळा चमत्कारिक स्वभावामुळे सबंध दिवस खराब जातो. तुम्हाला आपल्या घराबद्दल आपले पण आहे परंतु ओढा नाही. बऱ्याच वेळा तुम्ही अस्वस्थ असतात, अशावेळी एक किंवा दोन भाग्यांक असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही राहणे फायदेशीर ठरते .
शुभ दिवस:- रविवार ,सोमवार शुक्रवार, शनिवार
शुभ रंग:- पांढरा, निळा, गुलाबी
शुभ रत्न:- हिरा,मोती, पोवळे
(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.



Comments
Post a Comment