दैनिक राशिभविष्य
शुक्रवार, ४ जुलै २०२५.
![]() |
| बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280 |
आषाढ शुक्ल नवमी/दशमी. विश्वावसू नाम संवत्सर. शके १९४७, संवत२०८१. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे.
चंद्रनक्षत्र - चित्रा/(दुपारी ४.५० नंतर) स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. आज चांगले करार होतील. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. वाणिज्य विभागातील व्यक्तींना चांगला दिवस आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. मौल्यवान खरेदी होईल. कर्जे मंजूर होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल. सिद्धी प्राप्त होतील. संतती कडून चांगली बातमी समजेल. गुंतवणुकीतून लाभ होतील. शेअर्स मध्ये अंदाज बरोबर येतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे पार पडतील. चंद्र - गुरू योग स्वप्ने साकार करतील. अचानक लाभ होतील. भौतिक सुखे प्राप्त होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. विशेषतः महिलांकडून सहकार्य मिळेल. स्वप्ने साकार होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी खर्च कराल. महागडे वस्तू घ्याल. वाहन सुख लाभेल. भाग्योदय होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. अष्टम स्थानी शुक्र - हर्षल युती आहे. मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. सिद्धी प्राप्त होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुकूल ग्रहमान आहे. आज काही रखडलेली कामे पूर्ण होतील. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र अनुकूल आहे. महिलांकडून लाभ होतील. मन आनंदी राहील. इच्छा पूर्ण होतील. भागीदारी व्यवसायात चांगलेया मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्यासाठी अनुकूल दिवस आहे. नोकरीत खुश खबर मिळेल. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स/लॉटरी यातून लाभ सांभावतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थनी चंद्र आहे. आता अनुकूलता वाढेल. प्रवासाचे योग येतील. धनलाभ होईल. कुलदेवतेची प्रसन्नता लाभेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. मन आनंदी राहील. हातून चांगली कामे होतील. सौख्य लाभेल. वेळेचा सदुपयोग करा.
-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि आजचे राशिभविष्य:-
४ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक चळवळीचा अनुभव घेतात. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुमच्यामध्ये एक या अंकाचे देखील सर्व गुण असतात मात्र तुम्ही त्या लोकांन इतके धीट नसतात. संधी मिळाल्यास तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकतात. हर्षल आणि चंद्र यांच्या एकत्रित पणामुळे अडचणींवर मात करणे जरा कठीण जाते. तुमचे विचार स्वतंत्र असतात त्यामुळे तुम्ही कधी कधी चमत्कारिक कृती करतात. बऱ्याच वेळा तुम्हाला नातेवाईकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. कोर्ट कचऱ्याशी तुमचा संबंध येतो. वैवाहिक जोडीदाराची निवड करताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. शक्यतो तुम्ही भागीदारी व्यवसाय टाळायला पाहिजे. मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग व्हावा असे तुम्हाला मनापासून वाटते. तुम्ही पद्धतशीर वागतात. तुम्हाला अनेक गुप्त शत्रू निर्माण होतात आणि ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही जुगारी वृत्ती टाळली पाहिजे. तुम्ही भूतकाळात जास्त रमतात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दलच्या कल्पना भरमसाठ असतात. तुमचा स्वभाव अस्थिर असतो आणि वागण्यामध्ये विरोधाभास जाणवतो.
व्यवसाय:- इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, यंत्रसामग्री, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअरिंग, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, शास्त्रज्ञ, कारखानदार, गूढ विद्या, अध्यात्म, ज्योतिष, हस्तसामुद्रक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- निळा, राखी, पांढरा, तपकिरी.
शुभ रत्न:- हिरा, पवळे, मोती.
(रत्ने घेतानाकुंडलीचा देखील उपयोग करा)


Comments
Post a Comment