दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

शनिवार, १९ जुलै २०२५

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280



 आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:- 


. आषाढ कृष्ण नवमी/दशमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज चांगला दिवस आहे" 


नक्षत्र: भरणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष. (शूल योग शांती)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी त्रिकोण योग तर बुधाशी केंद्र योग आहे. धाडस करण्याची इच्छा होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडते छंद जोपासले जातील. तंत्रज्ञानाचा योग्य वापर कराल. पाळीव पशूंपासून त्रास संभवतो.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. व्यावसायिक प्रगती होईल. कुटुंबासाठी खरेदी होईल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्यावा लागेल. मन प्रफुल्लित राहील. एखादा अपमानाचा प्रसंग येऊ शकतो. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. प्रवासात आनंद मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. मनाची स्थिरता वाढेल. शब्द जपून वापरा. महत्वाकांक्षा वाढेल. पराक्रम गाजवाल. भावंडांचे सुख लाभेल. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक लाभ होतील. तुमच्या बोलण्याला धार चढेल. मात्र एखादा चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल. दैवी शक्तीचा अनुभव येईल. वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या दुरुस्तीवर खर्च करावा लागेल. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. विनाकारण चिंता निर्माण होतील. जुनी येणी वसूल होतील.



तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. जुने वाद मिटतील. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गुंतणुकीतून लाभ मिळतील. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. व्यापार वाढेल. प्रवासात त्रास होऊ शकतो योग्य काळजी घ्या.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल. नात्यात विनाकारण गैरसमज होऊ शकतात. नदी पार करताना काळजी घ्या. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल. खरेदी - विक्रीतून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तृतीय चंद्र आहे. छोटे प्रवास घडतील. व्यवसायासाठी अनुकूल दिवस आहे. अनोळखी व्यक्तीशी संबंध येईल. वादविवाद होतील मात्र तुमची बाजू योग्य असणार आहे. चोरीचे भय आहे. नोकरांकडून त्रास सांभावतो.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)आर्थिक चिंता कमी होऊ लागतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवासात त्रास संभवतो. प्रतिकार शक्ती वाढेल.


ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments