हिंदू जन संघर्ष समितीच्या उपोषणाची ११ व्या दिवशी शुक्रवारी होणार सांगता

 हिंदू जन संघर्ष समितीच्या उपोषणाची ११ व्या दिवशी शुक्रवारी होणार सांगता 




       कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क 

सकल हिंदू समाजाच्या न्याय हक्कासाठी हिंदुजनसंघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा विजयी समारोप सोहळा शुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ठीक ११ वाजता सांगता होणार आहे . संदीप सासने, श्री. राजेंद्र तोरस्कर आणि सुनील सामंत या तिघांना आमरण उपोषणाची ११ अकराव्या दिवशी सांगता होत आहे .

हिंदू  जनसंघर्ष समितीचे शिष्टमंडळ गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मंत्रालयात ठाण मांडून बसले असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत. एकनाथजी शिंदे, ना.श्रीयुत.चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री श्रीयुत. प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठका घेऊन सकल हिंदू समाजाच्या ३१ मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून सकारात्मक चर्चा झाल्यानं उपोषणाच्या सांगतेचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिष्टमंडळात प्रामुख्यानं उदय बाबा भोसले, आनंदराव पवळ श्री. अभिजीत पाटील, गजानन तोडकर, श्री. विक्रमसिंह जरग,सौरभ निकम यांचा सहभाग होता. या मध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर शहराचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीयुत. राजेशजी क्षीरसागर यांनी शिष्टाई केली आहे.

Comments