आषाढी एकादशीनिमित्त विद्या मंदिर शिंगणापूर येथे ग्रंथ दिंडीचे आयोजन
कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क
आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर जवळ असणाऱ्या शिंगणापूर येथील विद्या मंदिर मधील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथ दिंडी संपूर्ण शिंगणापूर गावात जाऊन तेथील विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन परत शाळेमध्ये दिंडीचे समापन करण्यात आले.
शाळेतील मुलांनी अशा प्रकारे एकादशीला ग्रंथ दिंडीचे आयोजन करून ग्रंथाशिवाय पर्याय नाही हा असा संदेश सर्वत्र दिला. त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईचा गजर ही करण्यात आला एकूणच या एकादशीला शाळेतील वातावरण विठ्ठलमय बनले होते.
या दिंडीला शाळेचे मुख्याध्यापक अशोक कांबळे,बाजीराव जाधव सर, पुजारी सर , सूर्यवंशी सर ,पटले मॅडम, अपर्णा भंडारी, काळे बेरे, फल्ले,देशमुख जाधव, डवरी मॅडम आणि शाळेतील इतर स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले

Comments
Post a Comment