दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

बुधवार, ३० जुलै २०२५. 



 आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-


श्रावण शुक्ल षष्ठी. शके १९४७, संवत २०८१, विश्वावसु नाम संवत्सर. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज उत्तम दिवस आहे" *श्रीयाळ षष्ठी*  


नक्षत्र - हस्त/ (रात्री ९.५३ नंतर) चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र बुध लाभ योग आहे. गुरूशी चंद्राचा केंद्र योग आहे. तुमचा स्वभाव सरळ आणि स्पष्ट वक्ता आहे. आपल्या कामाशी काम असावे असे तुम्हाला वाटते. आज उत्तम व्यावसायिक यश लाभेल. त्याच बरोबर राहत्या जागेचं आणि बगीचा यांचा आनंद घ्याल. पाळीव पशूंसोबत वेळ व्यतीत केल्याने तुमचा तणाव कमी होईल.    

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुम्ही कलाप्रेमी आहात. सौंदर्य, वाद्यवादन, नृत्य, गायन यात तुम्हाला रुची आहे. आज आवडत्या छंदाला वेळ द्याल. त्यातून अर्थलाभ देखील होईल. महिलांना दागिने मिळतील. मात्र वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्ती बाबत समाधानकारक तोडगा निघणार नाही. 


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याकडे विक्री तंत्र आहे. उत्तम वक्तृत्व आहे. शब्दभांडार आहे. आज त्याच योग्य वापर करा. त्यास कलेची जोड द्या. घरात देखील आज तुमचे कौतुक होणार आहे. मात्र धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे तुम्हाला जमणार नाही.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुम्ही दयाळू असून उत्तम भोजन बनवतात. चवीने खाणे तुम्हाला चांगले जमते. आज तुमच्या या गुणांचा सन्मान होईल. बुद्धीचातुर्य चमकेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. मात्र एखादे धार्मिक कार्य अपुरे राहू शकते.  

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. द्वितीय चंद्र आहे. संयमाने काम करावे लागेल. विशेषतः आज एखादा मोठा निर्णय चुकू शकतो. योग्य सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. केतूचा जप करावा.   

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. व्यवसायात चांगली वाढ होईल. राशीस्वामी प्रसन्न आहे. सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्र मंडळी पासून लाभ होतील. चिकित्सा आणि संशोधन क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.   

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र प्रतिकूल आहे. नवव्या गुरुशी केंद्र योग आहे. धार्मिक कार्य पूर्ण करा. तीर्थाटन घडेल. मात्र इतर सहली टाळाव्यात. प्रवासात त्रास होऊ शकतो. कामानिमित्त मात्र भ्रमंती घडेल. बदली होऊ शकते. किंवा कामात बदल घडू शकतो.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल चंद्र आहे. तुमच्या अपेक्षेनुसार कामे पूर्ण होतील. तुम्ही फारसे धार्मिक नसतात. मात्र आज धर्म कार्य करण्यास ग्रहमान भाग पाडेल. प्रवास घडतील. 

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दशम चंद्र आहे. कामावर लक्ष केंद्रित करा. अधिकार वाढतील. प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल. सरकारी कामासाठी थांबावे लागेल. राजकीय बाबतीत कमी बोलणे हिताचे आहे. 

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. आर्थिक दृष्टीने चांगला कालावधी आहे. तुम्ही फारसे धार्मिक नसतात मात्र या कालावधीत तुम्ही केलेले धार्मिक कृत्य आणि दानधर्म यांचा नक्कीच लाभ होणार आहे. जोडीदाराची चांगली साथ लाभणार आहे. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अजूनही अनुकूलता नाही. कामानिमित्त भ्रमंती घडेल. मौल्यवान वस्तू मिळतील. संगणक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. संतती बाबत अप्रिय घटना घडू शकते. शेअर्स मध्ये अंदाज चुकू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. 

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. वेळ दवडू नका. संतती कडून चांगली बातमी समजेल. छोटी सहल घडेल. घरात संशयकल्लोळ होऊ शकतो. पत्नी/जोडीदाराला विश्वासात घ्या.    


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


३० जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

  

        तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आशावादी, उदार व नशीबवान असतात. धार्मिक स्थळांना भेट देणे तुम्हाला आवडते. काही चांगले गुण सुप्त स्थितीत असून बोलण्यात मोकळेपणा असतो. तुमच्यात उत्साह असूनही तुम्ही सतत अस्वस्थ असतात. कल्पनाशक्ती उत्तम असल्याने उत्तम दर्जाचे कलाकार, संगीतकार, लेखक होऊ शकतात. स्मरणशक्ती उत्तम असून नातेवाईक प्रिय असतात. तुम्ही कष्टाळू व उद्योगी असतात. बहुत करून आयुष्यात यश मिळते परंतु घरात कटकटी चालू असतात. अडचणींवर मात करण्याची शक्ती असते. आपल्या स्वतःच्या घराबद्दल व देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास करणे, इतर देशांचा अभ्यास करून स्वतःचे ज्ञान वाढवणे तुम्हाला आवडते. संशोधन करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. एकाच वेळी खंबीरपणा व भित्रेपणा असे दोन्ही गोष्टी तुमच्या मध्ये अनुभवास येतात. विचारात आणि वागण्यात स्वतंत्रपणा असतो. धर्मबद्दल स्वतःच्या वेगळ्याच कल्पना असल्याने ठराविक व मान्यवर मार्गाचा अवलंबन करणे तुम्हाला आवडते. स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला आवडतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. कायदे, नियम पाळण्यास आवडते. खेळ व इतर कलांमध्ये भाग घेण्याची आवड असते. अनेकांशी तुमचा संपर्क येत असल्याने बराच वेळ लोकांचे कल्याण करण्यात जातो. दुसऱ्यांनी केलेली टीका तुम्ही फार मनाला लावून घेता. आर्थिक बाबतीत सुदैवी असून पैसे मिळवण्यात यशस्वी होता. आयुष्यात अधिकाराची पदे मिळाल्याने पैशाची कमतरता नसते. बौद्धिक कष्टाचे चीज होते. काही वेळा वारसा हक्काने पण पैसा उपलब्ध होतो. 


महिला:- तुम्ही परिस्थितीशी समझोता करणारे व निष्ठावान असतात. तुम्ही चांगल्या माता असून आपल्या मुलांवर व घरावर प्रेम करता. शांतता व आदर याचे तुम्ही प्रतीक असतात. तुम्ही पतीच्या व्यवसायात लुडबुड करीत नाहीत. काही वेळा चमत्कारिकपणा, चंचलपणा याचा प्रत्यय येतो. त्यामुळे घरात कटकटीचे वातावरण निर्माण होऊ शकते.


 शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार शुक्रवार


 शुभ रंग:-

 पिवळा ,जांभळा ,हिरवा आणि अंजिरी


 शुभ रत्ने :- पुष्कराज ,ॲमेथिस्ट लसण्या.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments