जगप्रसिद्ध "प्राडा" ब्रॅण्डच्या शिष्टमंडळाची कोल्हापूरच्या चप्पल लाईन ला भेट
इथल्या विक्रेत्या कडून जाणून घेतल्या कोल्हापुरी चप्पल बद्दल माहिती
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
इटलीतील "प्राडा" या जागतिक ब्रॅण्डच्या शिष्टमंडळाची सहा सदस्यांची टीम कालपासून कोल्हापुरात आली आहे. काल त्यांनी कोल्हापुरी चप्पल च्या उत्पादक आणि कारागिरांशी भेट त्यांनी घेतली आणि कोल्हापुरी चप्पलची निर्मिती कशी होते हे जाऊन घेतले . याच टीम ने आज कोल्हापुरातील चप्पल लाईन ला सकाळी भेट देऊन या चप्पलची विक्री कशी आणि ग्राहकांची असणारी मागणी हे जाणून घेतले .
"प्राडा" च्या मिलान येथील इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये कोल्हापुरी चप्पल चे विनापरवाना प्रदर्शन केले होते. त्याबद्दल कोल्हापूर चेम्बर ऑफ कॉमर्स आक्षेप नोंदविला होता . त्याचेच पर्यवसान म्हणून प्राडा ने आपली चूक मान्य करीत आपले एक शिष्टमंडळ कोल्हापूरला पाठविले . कोल्हापुरी चपलाचे उत्पादन, येथील कारागीर आणि विक्री याबद्दल माहिती जाणून घेतली.
भविष्यात कोल्हापुरी चप्पल ची खरेदी कोल्हापुरातून करून या ब्रॅण्डला एक उचित सन्मान देऊ असे आश्वासनं या टीम दिले . आगामी काळात कोल्हापुरी चप्पल साठी प्रद हे मोठे व्यासपीठ ठरू शकते .

Comments
Post a Comment