दैनिक राशिभविष्य
रविवार, ६ जुलै २०२५
![]() |
| बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280 |
आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्टये:-
. आषाढ शुक्ल एकादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज विशाखा वर्ज्य दिवस आहे" *शयनी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास आरंभ*
चंद्रनक्षत्र - विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ/ (दुपारी ४.०१ नंतर) वृश्चिक. (विष्टी करण शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम चंद्राचा हर्षल शी प्रति योग होणार आहे. धाडसी निर्णय घ्याल. मोठी जोखीम टाळा. महत्वाची कामे आज शक्यतो नकोत. व्यसने टाळा. एखाद्या करमणूक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. कुटुंब सुख लाभेल. मन आनंदी राहील. कामात काही बदल घडतील. प्रेम प्रकरणात यश लाभेल. पत्नीसाठी वेळ द्याल. स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचार कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. सुटीचा आनंद घ्याल. व्यापार उदीम वाढेल. भरभराट होईल. स्वतःच्या मौजेसाठी खर्च कराल. नोकरीच्या ठिकाणी महिलांकडून चांगले सहकार्य मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) बौद्धिक क्षेत्र गाजवाल. वेगळ्या वाटेने जाल. गृह सजावट कराल. शेतीतून लाभ होतील. वाद विवाद झाले असतील तर आज दिलजमाई होईल. तणाव कमी होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. नोकरीच्या ठिकाणी कटकटीं होऊ शकतात. अनपेक्षित घटना घडतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. धार्मिक पर्यटन घडेल. प्रवासाचे नियोजन बदलावे लागेल. नवीन वाहनाचे सुख मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. स्वप्ने साकार होतील. कुटुंब सुख लाभेल. अष्टमात हर्षल आहे. विनाकारण कोणाशीही शत्रुत्व घेऊ नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. विवेकबुद्धीचा वापर कराल. काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील. संध्याकाळ आनंदाची. चोरीचे भय आहे. वादविवाद टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्नाना नवे पंख फुटतील. वास्तू विक्रीचा व्यवसायात दिरंगाई जाणवेल. संध्याकाळ खर्चात टाकणारी असू शकते.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. धन धान्य वाढेल. नवीन संधी चालून येतील. एकादश चंद्र आनंद आणि उत्साह वाढता ठेवेल. छोटे प्रवास घडतील. लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम आणि दशम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल. ऐश्वर्य प्राप्त होईल. एकत्र कुटुंबासोबत वेळ व्यतीत होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. साडेसातीचा प्रभाव आज जाणवेल. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. भलती जोखीम घेऊ नका. ताकदवान लोकांशी शत्रुत्व घेणे अडचणींचे ठरू शकते.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
६ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला भेटून लोकांना आनंद होतो. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो. तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होणायची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत.
व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment