आषाढी एकादशी निमित्त शाहू मार्केट यार्ड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी

 आषाढी एकादशी निमित्त शाहू मार्केट यार्ड येथील  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी 



कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

शाहू मार्केट यार्ड येथील  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालाबाद प्रमाणे याहीवर्षी भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक मंडळातर्फे  खिचडी, वाटप करण्यात आले. या मंडळाचे हे २१ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले. याच ठिकाणी अभिषेक जाधव उर्फ लल्या, मुकुंद खाडे, हारिषभाऊ मालपाणी, प्रमोद नवनाथ , विक्रम बबलू  यांनी, "नाना कदम फौडेशन तर्फे केळी, लाडू  असा फराळ भाविकांना  वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले केले.



यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नायकवडी साहेब तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी वारके, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, डॉ संदीप पाटील यांनी भाविकांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. 

Comments