जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्तपंधरा वर्षाखालील व खुल्या अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा सोमवारी कोल्हापुरात

 जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त कागल चे माजी आमदार दौलतरावजी निकम व सौ.विजया हणमंत इनामदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंधरा वर्षाखालील व खुल्या अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा सोमवारी कोल्हापुरात  


कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

   101 व्या जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त कागल चे माजी आमदार ज्येष्ठ  स्वातंत्रसेनानी स्वर्गीय दौलतरावजी आप्पाजी निकम व कै.सौ.विजया हणमंत इनामदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंधरा वर्षाखालील मुलांच्या व खुल्या गटात अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा सोमवार दिनांक 21 जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता अयोध्या टॉवर पाचव्या मजल्यावरील हॉल, दाभोळकर कॉर्नर,एसटी स्टँड जवळ,कोल्हापूर येथे आयोजित केल्या आहेत.     

    चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या या स्पर्धेस युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेस् व आयोध्या फाउंडेशनचे कॅप्टन उत्तम पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. स्वर्गीय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कागलचे  माजी आमदार श्री दौलतराव आप्पाजी निकम यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय बुद्धिबळपटू रवींद्र निकम यांनी पंधरा वर्षाखालील मुला मुलींची अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा पुरस्कृत केल्या आहेत तर कै.सौ.विजया हणमंत इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय बुद्धिबळपटू धनंजय इनामदार यांनी खुल्या गटाची अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा पुरस्कृत केल्या आहेत. 

पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात व खुल्या गटात स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने अतिजलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत. वेळेचे बंधन प्रत्येक खेळाडूस तीन मिनिटे व प्रत्येक चालीस दोन सेकंदाचा वाढीव वेळ दिला जाणार आहे.दोन्ही स्पर्धेत प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण दहा हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवली आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी ठेवली आहे.

 इच्छुक बुद्धिबळपटू नी आपली नावे प्रवेश फी सह सोमवार दिनांक 21 जुलै दुपारी दोन वाजेपर्यंत   

खालील व्यक्तींकडे  नोंदवावीत... 

भरत चौगुले - 9850653160, 

उत्कर्ष लोमटे - 9923058149, 

मनिष मारुलकर - 9922965173,

 प्रीतम घोडके - 8208650388

Comments