दैनिक राशिभविष्य
गुरूवार, १७ जुलै २०२५
![]() |
| बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280 |
आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांची वैशिष्ट्ये:-
. आषाढ कृष्ण सप्तमी/अष्टमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
"आज करि दिन आहे" काळाष्टमी
चंद्र नक्षत्र - रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राची बुध आणि शुक्राशी शुभ योग आहे. आनंदी दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र असला तरीही आज ग्रहमान प्रगती साधणारे आहे. जमीन व्यवहारातून चांगलं लाभ होतील. छोट्या सहलीचे बेत आखले जातील. शेतकऱ्यांकडे पशुधन वाढेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायातून उत्तम लाभ होइल. कलाकारांना संधी मिळेल. प्रणय रम्य दिवस आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत होईल. लेखकांना चांगला दिवस आहे. मात्र सरकारी नियमांचा आदर करावा लागेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यवसाय वाढीसाठी पोषक ग्रहमान आहे. आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. नोकरीच्या जागी महिलांकडून उत्तम सहकार्य मिळेल. चैनीसाठी खर्च कराल. वक्तृत्व गाजेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज सुखद अनुभव येतील. अनुकूल शुक्र तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करेन. वाहन सौख्य लाभेल. प्रिय मित्रमंडळी भेटतील. आज कार्यक्षमता वाढेल. महत्वाची कामे पूर्ण होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. स्त्री धन वाढेल. उद्योग/व्यवसायात भरभराट होईल. जमीन व्यवहारातून यश मिळेल. वाहनांसाठी खर्च करावा लागेल. महिलांसाठी चांगले ग्रहमान आहे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सप्तम स्थानी चंद्र आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. सहल घडेल. योग्य त्या व्यक्तीशी संपर्क होईल. मात्र सरकारी कामास दिरंगाई होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक लाभ होतील. धातू, दागिने आणि वस्त्र या क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. आज कार्यक्षमता वाढेल. प्रवासात अडचणी संभवतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जवळचे प्रवास घडतील. संधी चालून येतील. संततीची नाराजी दूर होईल. शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास अनुकूलता आहे. शत्रू त्रास जाणवेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. घरगुती कामास वेळ दयावा लागेल. भागीदारी व्यवसायात मतभेद संभवतात. गुप्तशत्रू त्रास देतील. नैतिकता सोडू नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमान आहे. आज कामे पूर्ण होतील. व्यवसाय वाढेल. आर्थिक आवक मनासारखी होणार आहे. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय स्थानी चंद्र आहे. उधारी वसूल होईल. आर्थिक चिंता मिटतील. नफा वाढेल. वाहन सौख्य लाभेल. गृह सजावट कराल. आरोग्याबाबत सजग व्हाल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. व्यवसायातून लाभ मिळतील. मेजवानी मिळेल. कामाचा वेग वाढेल. कलाकारांना चांगले यश मिळेल. सामाजिक कार्य करताना संयम ठेवा.
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
१७ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनि आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. तुम्ही शांतताप्रिय असून लोक कल्याणाकरिता प्रयत्न करतात. गूढ विद्यांबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही बुद्धिमान,धाडसी, प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहात. संशोधन आणि ज्ञान यांची तुम्हाला आवड असते. स्वतःच्या कल्पनेतून आणि विचारांतून तुम्हाला यश मिळते. तुम्ही समतोल स्वभावाचे असून दोन्ही बाजूंचा विचार करणारे आहात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना तुम्ही समांतर विचार करतात. तुम्ही कडक शिस्तीचे आहात. तुम्ही निश्चयी आणि कर्तव्य तत्पर आहात. तुम्हाला एकांतात राहणे आवडते. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दलचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतात तसेच बहुतेक गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करतात. तुम्ही कधीही अतिउत्साही नसतात. थोडेफार उदास असतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तुमची तयारी असते. तुम्ही महत्त्वाकांक्षी आणि दीर्घोउद्योगी असतात. कधी कधी तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि योग्य गोष्टींबद्दल तुम्हाला आदर असतो. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. तुम्ही धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तुमच्याकडे अधिकार आणि जोम भरपूर आहे. व्यवहारीक गोष्ट तुम्ही सुलभपणे हाताळतत्. तुम्ही इतरांच्या अनावश्यक जबाबदाऱ्या उगाचच खांद्यावर घेतात. कधीकधी जीवनात तुम्हाला नैराश्य येते. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये मिसळले पाहिजेत. काही वेळा तुमच्यातील भित्रेपणा तुम्हाला धक्का देऊ शकतो. इतरांवर वर्चस्व गाजवणे तुम्हाला आवडते.
व्यवसाय:- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, लाकूड, कोळसा, लोखंड संबंधित व्यवसाय. व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी. नोकरी आणि व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ अंक:- एक, तीन, आठ.
शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती किंवा काळा हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


Comments
Post a Comment