दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 शुक्रवार, १८ जुलै २०२५

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280




. आषाढ कृष्ण अष्टमी/नवमी. वर्षा ऋतू, विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज उत्तम दिवस आहे.  


 चंद्रनक्षत्र - अश्विनी.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र - गुरू लाभ योग आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. कठोर भूमिका घ्याल. न्याय कराल. घरगुती कामासाठीवेळ द्यावा लागेल.  

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 

व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. सिद्ध व्यक्तीचा सहवास लाभेल. दानधर्म कराल. विनाकारण वाद करू नका. अति धाडस नको.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचे सान्निध्य लाभेल. ऐश्वर्य लाभेल. वाहन सुख मिळेल. घराचे स्वप्न साकार होईल.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. नोकरीत पुरेशी प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. अन्नदान करा. पाळीव पशूंपासून काळजी घ्या.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. यशाची शिखरे गाठाल. अनुकूल गुरू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सुटतील. नोकरीच्या ठिकाणी अत्यंत चांगले अनुभव येतील. मनासारखी बढती होईल. 

 


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. धार्मिक पर्यटन घडेल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. शत्रू त्रास जाणवेल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल. दिलेला शब्द पाळावा लागेल. अनैतिक मार्गाने येणारे उत्पन्न अंतिमतः त्रासदायक ठरणार आहे.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. शेअर्स मधून लाभ होतील. कोर्टात यश मिळेल. पत्नीचा सल्ला मानणे हिताचे आहे.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. कामाची गती वाढेल. आरोग्य सुधारेल. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. संतती कडून खुश खबर मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. आर्थिक भरभराट होईल. 

 

लवकरच......

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. नियोजनात बदल होईल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल. जमीन व्यवहारातून लाभ होतील. मालक - भाडेकरू प्रश्न सुटतील. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


 

18 जूलै  रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

  

        तुमच्यावर  मंगळ आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. 

         तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती ,करारीपणा व चिकाटी असल्यामुळे कोणत्याही अडचणींवर मात करू शकता. तुम्ही निर्भय व धैर्यवान आहात. वडिलोपार्जित संपत्ती मध्ये तुम्हाला वाटा मिळतो. तुम्ही कष्ट करणारे असून योग्य निर्णय घेता. दुसऱ्यावर हुकूमत गाजवणे आवडते. गतजीवना मध्ये मिळालेल्या मिळालेल्या अनुभवानुसार पुढील जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही ज्या व्यवसायात असता त्यात पैशाची कमतरता नसते. तुम्ही शिस्तप्रिय असून दुसऱ्याला मदत करायला आवडते. तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे आक्रमकता, प्रतिकार ,धाडस  तडफ ,तत्परता ही तुमची वैशिष्ट्य आहेत. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा तुम्ही उत्तम तोंड देऊ शकता. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो परंतु तुमचा उद्देश मात्र चांगला असतो. शक्यतोवर दुसऱ्यावर टीका करू नये काळजीपूर्वक शब्द वापरावे. तुमच्या स्वभाव तापट व धाडसी आहे. खेळाची व शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते. स्मरणशक्ती उत्तम असून नातेवाईक प्रिय असतात. झटपट पैसा मिळावा अशी अपेक्षा असते. भूतकाळात रमणारे असून कर्तृत्वाबद्दल भरमसाठ कल्पना असतात. पीडितांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुम्ही लहरी व  चमत्कारिक असू शकतात आणि वागण्यात अनिश्चितता असते. तुमच्या मनाची शक्ती प्रबळ असून त्यानुसार तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही विचारवंत व अभ्यासू वृत्तीचे आहे असतात. तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार काळाच्या फार पुढे गेलेले असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. तुमच्या आवडीनिवडी ठाम असतात. तुमची तत्त्वे तुम्ही सोडत नाहीत. पैशाच्या बाबतीत एक तर तुम्ही नशीबवान असतात. वृत्ती खर्चिक असून आवडत्या व्यक्तीवर खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाही. आपल्या कामाबद्दल ,परिस्थितीबद्दल आणि मिळालेल्या दर्जाबद्दल तुम्ही सुखी व समाधानी असतात. परिस्थितीशी समझोता करणे तुम्हाला आवडते. स्वतःचा नोकरी धंदा करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.


शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शनिवार


शुभ रंग:- तांबडा, पिवळा पांढरा


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती माणिक.


(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)

Comments