दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

गुरूवार, ३१ जुलै २०२५




आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-


. श्रावण शुक्ल सप्तमी. वर्षा ऋतू. विश्ववसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज शुभ दिवस आहे" *सितला सप्तमी*


चंद्र नक्षत्र - चित्रा . आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या/(दुपारी ११.१५ नंतर) तुळ.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज अत्यंत आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. मित्रमंडळींसोबत धमाल करणार आहात. लेखकांना चांगला कालावधी आहे. तुमच्या हातून शुभ कार्य घडणार आहे.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुम्ही स्वभावाने शांत आहात. कलेची आवड आहे. आज तुमच्यातील कलाकाराला प्रोत्साहन मिळेल. व्यवसाय वाढेल. पत्रकारांना किंवा राजकीय लेखकांना आज विशेष लाभ मिळणार आहेत. भौतिक सुखे आणि विरक्ती यात मन दोलायमान होईल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन आनंदी करणारे ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. तुमच्या राशीतील शुक्राचा पंचमातील चंद्राशी त्रिकोण योग आहे. आज मौज करण्याचा दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. महिलांना भेटवस्तू मिळतील. छोटी सहल घडेल. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चतुर्थ चंद्र आहे. ग्रहांचे पाठबळ मिळत आहे. त्याचा लाभ घ्या. आनंदी राहाल. तुम्हाला राजकारणात फारसा रस नसतो मात्र आज तुमची सरकार दरबारी कामे होतील. तुमचा सल्ला इतरांना मोलाचा ठरेल. गृह सजावट कराल. नवीन वाहन खरेदी होऊ शकते. 


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उद्योग- व्यवसाय वाढणार आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. बहुतेक सुखे प्रपात होतील. राजकारणात रस निर्माण होईल. सरकारी कामे रेंगाळतील. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) रवी - बुध अनुकूल आहेत. भाग्योदय होईल. लक्ष्मी प्रसन्न राहील. मान सन्मान मिळतील. आज वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यास चांगला दिवस आहे. महिलांना नोकरीच्या ठिकाणी उत्तम सहकार्य लाभेल. वाहन सौख्य मिळेल.  

 


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नसली तरी तुमच्याच राशीत दुपार नंतर चंद्र आहे. कुलदेवतेची कृपा दृष्टी राहणार आहे. सहल घडेल. प्रिय व्यक्ती भेटेल. नोकरीच्या ठिकणी तुकचे कौतुक होऊ शकते.   

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकाळी ग्रहमान अनुकूल आहे. कामे पूर्ण करून घ्या. संयम ठेवावा लागेल. स्त्री धन वाढेल. आर्थिक लाभ होतील. मात्र नैतिकता सोडू नका. कामानिमित्त भ्रमंती घडेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. आज प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे. विवाह इच्छुकांना खुश खराब मिळू शकते. मन प्रसन्न राहील. तुमचे आवडते छंद जोपासले जातील. सरकारी कामात मात्र दिरंगाई नको. विनाकारण सरकारी अधिकाऱ्यांशी वाद घालू नका.

   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकल आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी महिलांकडून सहकार्य मिळेल. वस्त्रे, अलंकार विक्रीतून लाभ होतील. तुमचे स्पर्धक मात्र आज बलवान असणार आहेत. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाची सुरुवात फारशी चांगली नाही. मात्र सकाळी ११ नंतर अनुकूलता वाढेल. ग्रहमान तुम्हाला समाधान देईल. व्यवसाय वाढेल. कुलदेवतेची कृपा दृष्टी लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. आरोग्याचे प्रश्न मात्र निर्माण होऊ शकतात. 

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)सकाळी ग्रहमान प्रसन्न आहे. मदत मिळणार आहे. स्वप्ने साकार होतील. वाहन सुख मिळेल. दुपार नंतर मात्र अनुकूलता नाही. महिलांकडून सहकार्य मिळणार नाही. गैरसमज होऊ शकतात.


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


३१ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर हर्षल, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला वयाच्या चाळीस नंतर उत्तम यश मिळते. तुमच्या कामाचे फळ तुम्हाला चटकन मिळावे अशी तुमची अपेक्षा असते. तुम्ही व्यावहारिक असतात आणि तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. तुम्हाला प्रवासाची आवड असते. तुमची उंची चांगली असते आणि तुम्ही दिसायला आकर्षक असतात. तुम्ही बुद्धिमान असून तुमचा स्वभाव विचारी असतो आणि तुमच्या मध्ये आपुलकीची भावना असते. तुम्हाला चांगल्या दर्जाची नोकरी मिळते आणि उत्तम पैसा मिळतो. तुम्ही दिसायला गरीब असला तरी मनातून हट्टी असतात. इतरांना तुमच्या सहवासात आनंद मिळतो आणि हे बघून तुम्हाला समाधान लाभते. बुद्धिमान वर्तुळात वावरणं तुम्हाला आवडते. स्वतःच्या अती आक्रमक स्वभावाला तुम्ही आळा घातला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक चळवळीचा अनुभव घेतात. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुमच्यामध्ये एक या अंकाचे देखील सर्व गुण असतात मात्र तुम्ही त्या लोकांन इतके धीट नसतात. संधी मिळाल्यास तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकतात. हर्षल आणि चंद्र यांच्या एकत्रित पणामुळे अडचणींवर मात करणे जरा कठीण जाते. तुमचे विचार स्वतंत्र असतात त्यामुळे तुम्ही कधी कधी चमत्कारिक कृती करतात. बऱ्याच वेळा तुम्हाला नातेवाईकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. कोर्ट कचऱ्याशी तुमचा संबंध येतो. वैवाहिक जोडीदाराची निवड करताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. शक्यतो तुम्ही भागीदारी व्यवसाय टाळायला पाहिजे. मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग व्हावा असे तुम्हाला मनापासून वाटते. तुम्ही पद्धतशीर वागतात. तुम्हाला अनेक गुप्त शत्रू निर्माण होतात आणि ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही जुगारी वृत्ती टाळली पाहिजे. तुम्ही भूतकाळात जास्त रमतात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दलच्या कल्पना भरमसाठ असतात. तुमचा स्वभाव अस्थिर असतो आणि वागण्यामध्ये विरोधाभास जाणवतो. 


व्यवसाय:- इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, यंत्रसामग्री, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअरिंग, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, शास्त्रज्ञ, कारखानदार, गूढ विद्या, अध्यात्म, ज्योतिष, हस्तसामुद्रक.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.


शुभ रंग:- निळा, राखी, पांढरा, तपकिरी.


शुभ रत्न:- हिरा, पवळे, मोती.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments