येत्या शनिवारी १५ वर्षाखालील खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा

येत्या शनिवारी १५ वर्षाखालील खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा  



कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

शनिवार  दि. २ ऑगस्ट रोजी अनुज चेस ॲकॅडमीच्या सहकार्याने मा. श्री प्रवीण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय खुली व १५ वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 मटकरी मंगल कार्यालय, कागल येथे ही स्पर्धा होईल. सदर स्पर्धेचे उद्घाटन आरोग्य मंत्र महाराष्ट्र राज्य मा. श्री. हसनसो मुश्रीफ साहेब यांचे हस्ते होईल. स्पर्धा खुली व १५ वर्षांखालील (जन्म तारीख : १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर) अशा २ गटात होणार आहे. 

या स्पर्धेसाठी एकूण बक्षिसे ३६ रोख बक्षिसे २५०३० चषक १८ मेडल १८ असे बक्षिसांचे स्वरूप आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी सांगली, सातारा, बेळगाव, गोवा, पुणे, जयसिंगपूर इचलकरंजी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील नामांकित खेळाडूंना आमंत्रित केले आहे. दि. ०१ ऑगस्ट पर्यंत सहभाग नोंदवावा. वयोगटातील स्पर्धकांनी आधार कार्ड चा फोटो पाठवावा.  सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहीतीसाठी संपर्क 

प्रतीक नाळे (९९७०७६३९९८),

 रविराज पिस्टे (९५९५९२६८६७ ) 

 कृष्णात पाटील (९४२११०४६५०),

 बाबुराव पाटील (९४२२७९०४९५), 



Comments