दैनिक राशिभविष्य
सोमवार, २१ जुलै २०२५.
आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्टये:-
, आषाढ कृष्ण एकादशी/द्वादशी. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
"आज उत्तम दिवस आहे. *कामीका एकादशी*
चंद्रनक्षत्र - रोहिणी (चंद्र)/मृग (मंगळ). आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी लाभ योग, मंगळाशी केंद्र योग आहे. शुक्राशी युती आहे. विपुल धन धान्य होईल. संपत्ती वाढेल. कर्तृत्व दाखवाल. न्याय कराल. पाळीव पशूंचे प्रेम निर्माण होईल. महिलांना भेटवस्तू मिळतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. शनी अनुकूल आहे. शत्रूवर विजय मिळेल. सन्मान प्राप्त होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. विचार पूर्वक कामे कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. लेखक, कलावंत यांना चांगला दिवस आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. मौल्यवान वस्तूची खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होतील. आवडत्या ठिकाणी भेट द्याल. घशाची काळजी घ्या. बोलताना विचार करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. महिला नातेवाईकांच्याकडून सहकार्य मिळेल. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. महिलांना भेटवस्तू मिळतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. मन प्रसन्न राहील. महिला सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. सन्मान मिळतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कुलदेवतेची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. प्रवास घडतील. आज तुमचा राशीस्वामी प्रसन्न आहे. कार्यक्षमता वाढेल. बुद्धिमान वर्तुळात तुम्ही नाव कमवाल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. षष्ठ स्थानी शनी, अष्टम स्थानी चन्द्र आहे. फारशी अनुकूलता नाही. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. कामानिमित्त भ्रमंती होईल. विनाकारण गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सातवा चंद्र आहे. दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. चपळता वाढेल. सार्वजनिक संस्थेशी संबंध येईल. प्रवास घडतील. पत्नीला समजून घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. शेती/घरच्या कामासाठी वेळ द्यावा लागेल. येणी वसूल होतील. स्वतःच्या चैनीसाठी खर्च कराल. मेजवानीचे बेत आखले जातील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पंचम शनी चंद्र आहे. व्यावसायिक प्रांतात उत्तम यश लाभेल. विक्री क्षेत्रात प्रगती कराल. गुंतवणुकीतून उत्तम लाभ होतील. अचानक लाभ होईल. गृहसौख्य लाभेल. संतती कडून आनंदाची बातमी समजेल. हरवलेली वस्तू सापडेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र शुक्राच्या युतीत आहे. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. गृह सजावट कराल. वडिलोपार्जित इस्टेटीचा प्रश्न मार्गी लागेल. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. महिलांकडून सन्मान मिळेल. कामानिमित्त भ्रमंती घडेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायिक प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. उच्च स्थान प्राप्त होईल. कला प्रांतात मोठे यश मिळेल. प्रवास घडतील. त्यातून उत्तम लाभ मिळतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घ्या.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
२१ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर गुरु चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. आयुष्यात प्रसिद्धी व मानमरातब उशिरा मिळतात. उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते अतिशय स्वाभिमानी असतात. संशयी वृत्ती असते .प्रकृतीची कुरबुर सतत चालू असते .इतरांची ढवळाढवळ कामात तुम्हाला सहन होत नाही .धारिष्ट्य वान असून कोणत्याही संकटाला तोंड देतात. आपल्या स्वतःच्या घराबद्दल व देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास करणे ,इतर देशांचा अभ्यास करून स्वतःचे ज्ञान वाढवणे तुम्हाला आवडते. संशोधन करण्याकडे तुमचा अधिक कल असतो .एकाच वेळी खंबीरपणा व भित्रेपणा असे दोन्ही गोष्टी तुमच्या मध्ये अनुभवास येतात .विचारात आणि वागण्यात स्वतंत्रपणा असतो .धर्म याबद्दल स्वतःच्या वेगळ्याच कल्पना असल्याने ठराविक व मान्यवर मार्गाचा अवलंबन करणे तुम्हाला आवडते .स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला आवडतात .तुम्हाला मोठ्यांनी बोलण्याची सवय असते .कायदे नियम पाळण्यात आवडते खेळ व इतर कलांमध्ये भाग घेण्याची आवड असते .अनेकांशी तुमच्या संपर्क येत असल्याने बराच वेळ लोकांचे कल्याण करण्यात जातो .दुसऱ्यांनी केलेली टीका तुम्ही फार मनाला लावून घेता. आर्थिक बाबतीत सुदैवी असून पैसे मिळवण्यात यशस्वी होता. आयुष्यात अधिकाराची पदे मिळाल्याने पैशाची कमतरता नसते .बौद्धिक कष्टाचे चीज होते. काही वेळा वारसा हक्काने पण पैसा उपलब्ध होतो .तुम्ही परिस्थितीशी समझोता करणाऱ्या व निष्ठावान असतात. तुम्ही चांगल्या माता असून आपल्या मुलांवर व घरावर प्रेम करता. शांतता व आदर याचे तुम्ही प्रतीक असतात .तुम्ही पतीच्या व्यवसायात लुडबुड करीत नाहीत. काही वेळा चमत्कारिक पणा चंचलपणा याचा प्रत्यय येतो. त्यामुळे घरात कटकटीचे वातावरण निर्माण होते.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार शुक्रवार
शुभ रंग:-
पिवळा ,जांभळा ,हिरवा आणि अंजिरी
शुभ रत्ने :- पुष्कराज ,ॲमेथिस्ट.
-ज्योतिषी मंगश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


Comments
Post a Comment