रिलायन्सचा ब्रँड ‘कॅम्पा’ आता नेपाळमध्येही उपलब्ध

 रिलायन्सचा ब्रँड ‘कॅम्पा’ आता नेपाळमध्येही उपलब्ध




रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि चौधरी ग्रुपने नेपाळमध्ये ‘कॅम्पा’चे लॉन्चिंग केले

• यूएई, ओमान, कतार आणि बहरीननंतर आता नेपाळमध्येही मिळणार भारतीय ब्रँड ‘कॅम्पा’

• २५० मिलीची ‘कॅम्पा कोला’, ‘कॅम्पा ऑरेंज’ आणि ‘कॅम्पा लेमन’ची किंमत ३० नेपाळी रुपये असेल


काठमांडू, १४ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने चौधरी ग्रुप (CG) सोबत भागीदारी करत भारतीय शीतपेय ब्रँड ‘कॅम्पा’चा नेपाळमध्ये अधिकृतपणे शुभारंभ केला आहे. रिलायन्सने २०२३ मध्ये ‘कॅम्पा’ला पुन्हा भारतीय बाजारपेठेत आणले होते. अवघ्या दोन वर्षांतच ‘कॅम्पा’ने भारतीय शीतपेय बाजारात एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. जीसीसी देशांमधील (यूएई, ओमान, कतार, बहरीन) यशस्वी पदार्पणानंतर आता कंपनीने ‘कॅम्पा’ला नेपाळमध्येही सादर केले आहे.


रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक केतन मोदी म्हणाले, “आम्ही आमचे सहकारी चौधरी ग्रुपसोबत ‘कॅम्पा’ ब्रँडसह नेपाळच्या बाजारात प्रवेश करताना अत्यंत उत्साहित आहोत. ‘कॅम्पा’ हा ५० वर्षांहून अधिक जुना भारतीय ब्रँड आहे, जो आजही ग्राहकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. आम्हाला या भागात वेगाने वाढण्याच्या प्रचंड संधी दिसत आहेत. जागतिक दर्जाचे उत्पादने परवडणाऱ्या दरात ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा अनुभव सकारात्मक राहिला आहे. आम्हाला विश्वास आहे की ‘कॅम्पा’ नेपाळी ग्राहकांसाठी एक ताजेतवाने आणि उत्कृष्ट पर्याय ठरेल.”


‘कॅम्पा’च्या नेपाळ लाँचिंगबाबत चौधरी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निर्वाण चौधरी म्हणाले, “आम्हाला आनंद आहे की आम्ही ‘कॅम्पा’ ब्रँड रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्ससोबत नेपाळमध्ये आणू शकलो. ही भागीदारी उच्च दर्जाची शीतपेये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ‘कॅम्पा’ हे स्थानिक चवप्रेमी ग्राहकांशी घट्ट नातं निर्माण करेल, असा आम्हाला विश्वास आहे. ही धोरणात्मक भागीदारी केवळ आमच्या पेय पदार्थांच्या पोर्टफोलिओचा विस्तार करणार नाही, तर नेपाळमधील स्पर्धात्मक शीतपेय बाजारात आमची भूमिका आणखी बळकट करेल. आमच्या मजबूत वितरण नेटवर्क आणि बाजारातील जाणिवेचा उपयोग करून ‘कॅम्पा’ला नेपाळमध्ये एक लोकप्रिय ब्रँड बनवण्याचा आम्ही उत्सुकतेने प्रयत्न करू.”


‘कॅम्पा’ पोर्टफोलिओची खासियत म्हणजे स्पर्धकांपेक्षा किफायतशीर दरात पेये उपलब्ध करून देणे. नेपाळमध्ये सुरुवातीला ‘कॅम्पा कोला’, ‘कॅम्पा लेमन’, ‘कॅम्पा ऑरेंज’, ‘कॅम्पा एनर्जी गोल्ड बूस्ट’ आणि ‘कॅम्पा एनर्जी बेरी किक’ ही उत्पादने उपलब्ध असतील. भविष्यात यामध्ये अधिक पेयांची भर घालण्यात येईल. २५० मिलीचे ‘कॅम्पा कोला’, ‘कॅम्पा ऑरेंज’ आणि ‘कॅम्पा लेमन’ हे शीतपेय ३० नेपाळी रुपयांना मिळतील, तर ‘कॅम्पा एनर्जी बेरी किक’ (२५० मिली) ४० नेपाळी रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

Comments