"जब मिल बैठेंगे पाच यार" उबाठा शिवसेनेतर्फे अनोखे आंदोलन
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात आज "जब मिल बैठेंगे पाच यार" या आशयाचे उबाठा शिवसेनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्याची चर्चा आज शहरात सर्वत्र सुरू आहे. महायुतीच्या सरकारमधील विद्यमान मंत्री आणि आमदारांचे कारनामे उघडकीस येत आहे.
याचे प्रतिबिंब जनसामान्यात उमटत आहे याचेच प्रतिक म्हणून आजचे हे उबाठा चे मूक प्रदर्शन आणि मूक निदर्शने आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. या मंत्र्यांचे प्रतिबिंब म्हणून उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले पोस्टर आणि मुखवटे एक चर्चेचा विषय बनला आहे. एकूणच हे आंदोलन म्हणजे जनतेचा मंत्र्याबद्दल असणारा रोष असल्याचे उबाठा शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. यावेळी उबाठा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Post a Comment