दैनिक राशिभविष्य
शनिवार, १६ ऑगस्ट २०२५.
श्रावण कृष्ण सप्तमी/अष्टमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज वर्ज्य दिवस आहे" *काळाष्टमी, गोपाळकाला*
नक्षत्र: कृतिका. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष/ (सकाळी ११.४४ नंतर) वृषभ. (ध्रुव योग शांती करून घ्यावी)
१६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे आहात. जितक्या लवकर तुम्ही अस्वस्थ होतात तितक्याच लवकर तुम्ही शांत होतात. इतरांची लुडबुड तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात सहन होत नाही. प्रकृतीची सतत कुरबुर चालू असते. तसे तुम्हीं शांतताप्रिय आहात. तुम्हाला कष्टाची कामेआवडत नाहीत.तुम्हला कलेत रमणे, निसर्ग, सहली, सिनेमा, नाटक यांची आवड आहे. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. मनात सदैव खळबळ चालू असते. तुम्ही मनाने विशाल असून जीवनाचे तुम्हाला उत्तम ज्ञान असते. तुम्ही मुलत: स्वतंत्र विचाराचे आहात. दूरवरच्या प्रदेशांबद्दल तुम्हाला आवड असल्याने तुमचा परदेश किंवा दूर देशाशी संबंध येतो. तुमच्यामध्ये अहंकार आहे. तुम्हाला आध्यात्मिक लाभ होतात. कधी कधी तुमचे विचार हट्टी आणि आग्रह होतात त्यामुळे इतरांच्या विचारांची उपेक्षा केले जाते. तुम्ही उत्तम पैसा कमवू शकतात. धर्माविषयी तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. ठराविक चाकोरीत वावरणे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही निसर्गात: अस्वस्थ असतात. तुम्ही भावनाप्रधान असतात आणि तुमच्या भावना तुम्ही मित्रांकडे व्यक्त करत नाहीत. तुम्हाला उच्च प्रतीच्या लोकांमध्ये मिसळणे आवडते. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार्याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही उत्तम सल्लागार असतात. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुमच्या वागण्यात नियमित पणा आणि पद्धतशीर पण आहे. तुम्ही इतरांना उत्साह आणि चांगला सल्ला देतात. तुमचे व्यक्तिमत्व धीर गंभीर आहे. इतरांना तुमच्याबद्दल आदर वाटतो. मनाने तुम्ही मोकळ्या आहात. आणि तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारचा मुक्तपणा आहे. तुमच्यावर निर्बंध लादल्यास तुम्ही बंडखोरी करतात.
व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, सुगंधी द्रव्य, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- हिरवा आणि निळा.
शुभ रत्न:- पुष्कराज आणि पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज चंद्राचा शनिशी लाभयोग तर हर्षल शी युती आहे. अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम लाभ होतील. अचानक एखादी चांगली बातमी समजेल. मौल्यवान खरेदी होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) प्रवासातून लाभ होतील. सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. आनंद दायक वातावरण असेल. शेजारी, भाडेकरू याच्याशी विसंवाद संभवतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. अचानक एखादी सुखद घटना घडेल. खरेदी होईल. प्रवास घडतील. दुपारनंतर व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. लाभाची घटना घडेल. हरवलेली वस्तू सापडेल. स्थावर संपत्तीचे काम मार्गी लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक भरभराट चांगली होणार आहे. वेळ दवडू नका. व्यवसाय वाढेल. व्यापार वृद्धिंगत होईल. प्रवास घडतील. आज तुमचा राशीस्वामी सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करतआहे. आत्मविश्वास वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. सुरुवात फारशी अनुकूल नाही. मात्र दुपारनंतर परिस्थिती बदलेल. प्रवासातून कार्य साधेल आणि लाभ होतील. अचानक सुखद घटना घडेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुरुवात चांगली आहे. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. मनासारखी कामे होतील. अति धाडस टाळा. दुपारनंतर अनुकूलता काहीशी कमी होईल. मात्र सूर्य अनुकूल झाल्याने उत्साह काहीसा वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती साध्य होईल. धन -धान्य आणि संपत्ती वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. सहकार्य लाभेल. नोकरीत वरिष्ठ स्थानवर जाल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पंचम आणि षष्ठ चंद्र आहे. अनपेक्षित लाभ होतील. आरोग्य सुधारेल. सुखकारक बातमी समजेल. खरेदी होईल. सूर्याची नाराजी वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आनंदी राहाल. मेजवानी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. हर्षल शी शुभ योग आहे. अचानक लाभ होतील. लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तृतीय आणि चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती कामात वेळ द्यावा लागेल. सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे. आरोग्यात सुधारणा होईल. मात्र शत्रू त्रास जाणवेल. संयम बाळगावा लागेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्नांची उत्तरे मिळतील. अडचणी दूर होतील. नात्यातून लाभ होतील. कामे मार्गी लागतील. आरोग्य सांभाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment