दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

शनिवार, २३ ऑगस्ट २०२५. 




श्रावण अमावस्या/भाद्रपद प्रतिपदा. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज वर्ज्य दिवस आहे"   


नक्षत्र: मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- सिंह. (परीघ योग, नाग आणि किंस्तुघ्न करण शांती करून घ्यावी)


२३ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर बुध, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुमची स्वतःची स्वतंत्र विचार पद्धती असते. तुम्ही दयाळू आणि स्वातंत्र्य प्रिय असतात. बोलण्यात हुशार असतात. घरातील दुर्बल व्यक्तीची तुंचायवर जबाबदारी असते. इतरांवरहुकूमतगाजवणे तुम्हाला आवडते. तुम्ही कठोर स्वभावाचे असतात आणि इतरांवर टीका करतात. तुम्ही उंच आणि देखणे आहात. इतरांनातुम्ही दुखावत नाहीत.स्त्रिया सुखी असतात मात्र संतती होताना त्रास होऊ शकतो.कोडे सोडवण्याचा, लॉटरी आणि जुगार याचा छंद असू शकतो. इतरांची तुमच्यावर भक्ती असते. तुम्ही मितभाषी असतात.  तुम्ही अत्यंत हुशार, बुद्धिमान, संशोधक, शास्त्राची आवड असणारे, व्यापारी वृत्तीचे आणि व्यवहार चतुर असतात. तुमच्या व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशी पण आवडत नाही. कोणत्याही कामाच्या तुम्ही उत्तम पूर्व नियोजन करतात. अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडावे याचे तुम्हाला आपोआप मार्गदर्शन मिळते. तुमच्यात कधी कधी नैराश्य आणि अस्वस्थपणा येतो मात्र तो लवकरच निघून जातो. मनाने तुम्ही विशाल आहात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि सहली यांची आवड आहे. तुम्ही उत्तमपणे प्रशिक्षण वर्ग चालवू शकतात. निसर्गाशी एकरूप होऊन त्याचा आनंद लुटणे तुम्हाला आवडते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमची वृत्ती साशंक असते. तुमची चटकन खात्री होत नाही आणि विश्वास बसत नाही. तुम्ही नेहमीच सावध असतात. तुम्ही महत्त्वाकांक्षा आणि उत्साह आहात. हुशार आणि बुद्धिमान लोकांकडे तुमचा ओढा असतो. धर्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांची तुम्हाला आवड असते.



व्यवसाय:-  बँकिंग वैद्यकीय क्षेत्र संशोधन गणित कंपनी सेक्रेटरी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र केमिस्ट


शुभ दिवस:- बुधवार शुक्रवार शनिवार


शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा


शुभ रत्न:- पाचवा आणि हिरा

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. भलते धाडस करू नये. आज अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. प्रवासात त्रास संभवतो. नावलौकिक जपा. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) प्रवासातून लाभ होतील. अध्यात्मिक उन्नतीसाठी उत्तम कालावधी आहे. तुम्ही आज एक विरोधक म्हणून चांगली भूमिका बजावू शकतात.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. तृतीय स्थानी चंद्र आहे. अचानक एखादी सुखद घटना घडेल. खरेदी होईल. प्रवास घडतील. मात्र फारमोठा पराक्रम नको. जप करण्यास चांगला दिवस आहे.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. लाभाची घटना घडेल. हरवलेली वस्तू सापडेल. पित्याशी विसंवाद संभवतो. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत अमावस्या आहे. जपून पावले टाका. आत्मचिंतन करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अचेतन शक्तीचा अनुभव घ्याल. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रतिकूल दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र सूर्य युती आहे. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. कुलदेवतेची उपासना करा. 


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुरुवात चांगली आहे. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. नावलौकिक वाढेल. प्रसिद्धी मिळेल. अति धाडस टाळा. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती साध्य होईल. धन -धान्य आणि संपत्ती वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचा ताण वाढेल. गुंतवणूक टाळा.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवम चंद्र आहे. अनपेक्षित लाभ होतील. आरोग्य सुधारेल. सुखकारक बातमी समजेल. खरेदी होईल. राजकीय भाष्य टाळा.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. उगाच मोठी जोखीम घेऊ नका. नात्यात विनाकारण गैरसमज होऊ शकतात. नियोजन बदलेल.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या सप्तम स्थानी अमावस्या आहे. शत्रूचा त्रास वाढणार आहे. विनाकारण वादविवाद टाळा. कमी बोलणे हिताचे आहे. मन अस्वस्थ करणाऱ्या घटना घडू शकतात. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. विविध प्रश्नांची उत्तरे मिळतील. अडचणी दूर होतील. नात्यातून लाभ होतील. प्रश्न मार्गी लागतील.     


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments