कोल्हापुरातील पहिली धान्य बाजारपेठेतील मानाच्या दहीहंडीचा हनुमान तालीम मंडळ शिरोळ गोविदा पथक मानकरी
कोल्हापुर १७ सिटी न्यूज नेटवर्क
लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी सां.मंडळातर्फे शनिवार (दि. १६) रोजी घेण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेत एकूण ५ गोंविदा पथकानी सहभाग नोंदविला विजेत्या हनुमान तालीम मंडळ शिरोळ ये गोविंदा पथकास २१ हजार १११रु.चे बक्षीस सन्मान चिन्ह देण्यात आले.
धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेचे उपाध्यक्ष श्री विवेक शिवाजीराव शेटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध शेंगदाणा व्यापारी श्री शितल जयकुमार आवटे यांच्या शुभहस्ते दि कोल्हापुर ग्रेन मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष श्री संजीव परीख. दि कोल्हापूर ग्रेनकॅन्व्हासिंगअसोशिएशनचे अध्यक्ष श्री संभाजी पाटील प्रसिद्ध व्यापारी विवेक नानासाहेब नष्टे, दिपीन अश्विन पटेल, चंद्रकांत धनंजय कागले यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सव संपन्न झाला. उपस्थित सर्व गोविंदा पथकांना सलामीची संधी देण्यात आली.
त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला हनुमान तालीम मंडळ शिरोळ.... या...गोविंदा पथकाने ७ थरावरती कोल्हापुरातली मानाची दहीहंडी फोडली. आणि या मानाच्या दहीहंडी वर आपलं नाव कोरलं सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्ज सेंटर कणेरीमठाचे आपत्कालीन वैद्यकीय पथक यावेळी उपस्थित राहणार होते.
कोल्हापूर मधील पहिली मनाची दहीहंडी म्हणून ओळखली जाणाऱ्या दहीहंडीचा कार्यक्रम मंगळवारी दुपारी ५:३० वाजता लक्ष्मीपुरीतील धान्य लाइन येथे संपन्न झाला विजेत्या संघास २१,१११ रुपये, बक्षीस व सन्मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागी गोविंदा पथकास सलामीसाठी २५०१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत धान्य व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव यांनी केले . आभार विजय कागले यांनी मानले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सागर सन्नकी उत्सव कमिटी उपाध्यक्ष वैभव लाड सेक्रेटरी राहूल हळदे खजानिस गणेश सन्नकी, विजय कागले, बलराज निकम, सुरेश लिंबेकर सागर सन्नकी, अमित खटावकर, राजेश आवटे सिद्धार्थ कापसे विशाल कोगनोळे, यश मकोटे, विशाल घोडके, मयुर नष्टे, सम्मेद तपकिरे, धमेंद्र नष्टे रितेश हळदे आशिष क्षिरसागर यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments
Post a Comment