उत्तूर मध्ये रविवारी गणेशोत्सवानिमित्त भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
- अवधूत कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ने अवधूत गल्ली,इंदिरानगर, उत्तूर येथे गणेशउत्सवानिमित्त रविवार दिनांक 31ऑगस्ट रोजी भव्य खुल्या एकदिवशीय जलद बुद्धीबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने होणाऱ्या या खुल्या बुद्धिबळ स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस् लिग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहेत. खुल्या गटात पहिल्या दहा क्रमांकांना (1) रु.3,001/- व चषक 2) रु. 1,501/- व चषक 3) रु.1000/- व चषक 4)रु.500/- 5) रु. 400/- क्रमांक 6) ते 10) प्रत्येकी रु. 301/-) याप्रमाणे बक्षीसे ठेवली आहेत. याशिवाय महिला व जेष्ठ बुद्धिबळपटू, वयोगट 8, 10,12 व 14 वर्षाखालील मुले, उत्तूर गावातील उत्कृष्ट बुद्धिबळपटूना उत्तेजनार्थ रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी आपली नावे प्रवेश फी सह खालील व्यक्तींकडे 30 ऑगस्ट पर्यंत नोंदवावीत.१) रोहित पोळ - ९६५७३३३९२६, २)महेंद्र कामत - ९८२३५७६००९,३) शंकर सावंत - ७४९८७७४७९३, ४) देवदत्त काळगे - ८१०८५८४१०७, ५) प्रथमेश बरडे - ८४२१३११५२४
.jpeg)
Comments
Post a Comment