मराठा समाज भवन एक वर्षामध्ये उभा करणार सकल मराठा समाज कार्यकर्त्याचा निर्धार
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापुरात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण शहर, तालुका व गाव पातळीवर मराठा समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे मराठा समाजातील पाच संस्था व संघटनानी शासनाकडे मराठा भवनसाठी जागेची मागणी केलेली आहे मराठा समाजासाठीच्या कार्यासाठी स्थापन झालेला ट्रस्ट हा एखाद्या कुटुंबा पुरता किंवा जवळच्या व्यक्ती पुरता मर्यादित न रहाता मराठा समाजातील स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेते व कार्यकर्ते यांचा सर्व समावेशक असावा मराठा भवन हे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांनी जबाबदारी स्विकारुन एक वर्षामध्ये मराठा भवन उभारणे बाबत निर्धार आज कार्यकर्त्याच्या बैठकीत करण्यात आला. या बाबत सर्व कार्यकर्त्यांची बैठक शासकिय विश्राम गृह, कोल्हापूर (सर्किट हाऊस) येथे पार पडली.
या बैठकीत मध्ये खालीत निर्णय घेणेत आले
1) शासनाने मराठा समाजासाठी शहरा जवळ 10 एकर जागा त्वरीत द्यावी
2) कोल्हापुर जिल्ह्यातील प्रत्येक आमदार, खासदार यांनी फंडातून 10 कोटी पेक्षा अधिक निधी त्वरीत द्यावा
3) मराठा भवनसाठी सर्वसमावेशक समिती सन्मवयकांच्या सहभागासहित शासनाने जाहीर करावी
4) कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र व क्रीडाक्षेत्र असलेने परराज्यातून आलेल्या मराठा समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व अत्यावश्यक रुग्ण विनामूल्य राहणेची व्यवस्था व्हावी.
5) विभागीय प्रशिक्षण केंद्र (विविध प्रकारचे) तसेच शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळण्यासाठी अर्थसहाय मार्गदर्शन केंद्र त्या जागेत मंजूर व्हावे.
6) कौटुंबिक समुपदेशन केंद्र व व्यसन मुक्ती केंद्र तसेच सुसज्ज सभागृह, रक्तपेढी आदिसाठी सुसज्ज इमारत करण्यात यावी
या बैठकीसाठी प्रसाद जाधव, राजू सावंत, प्रसन्न शिंदे शिराळकर ,संजय साळोखे, उदय लाड ,निरंजन शिंदे ,प्रकाश घाटगे ,प्रदीप उलपे, प्रवीण खोपकर ,निलेश सुतार ,दीपक निंबाळकर ,वसंत जाधव ,संजय देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Comments
Post a Comment