महिलांचे पाणी प्रश्नावर आक्रमक आंदोलन - टिंबर मार्केट पाठोपाठ मिरजकर तिकटी येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन जल अभियंताच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित .
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
मिरजकर तिकटी येथे दोन तास महिलांनी पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन छेडले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत गरज असलेले पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. अखेर जल अभियंता आणि पदाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
काल मध्यरात्री परिसरातील महिलांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आज सकाळी मंगळवार पेठ टिंबर मार्केट परिसरातील महिला रस्त्यावर उतरल्या आणि मिरजकर तिकटी येथे मोठा रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे मंगळवार पेठ, खरी कॉर्नर व टिंबर मार्केट परिसरात वाहतुकीची मोठी गैरसोय झाली.
महिलांच्या जिव्हाळ्याच्या गणेशोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली असताना पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. यामुळे महिलांच्या भावना तीव्र झाल्या. अखेर जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी स्पष्ट केले की सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असून लवकरात लवकर ती दूर करून सायंकाळपासून मंगळवार पेठेत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.
भाजपा नेते व प्रांत सचिव महेश जाधव - विशाल शिराळकर - धनश्री तोडकर - गायत्री राऊत यांनी आंदोलन स्थळी आलेल्या जलविभागातील पदाधिकाऱ्यांना शब्दश : धारेवर धरले. भविष्यात समस्या न सुटल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात नियोजन रश्मी निवासराव साळुंखे, चिटणीस,लक्ष्मीपुरी मंडल, अवधूत श्रीराम भाट्ये, संयोजक:आयुष्मान भारत सेल, भा.ज.पा यांनी केले होते. या आंदोलनात प्रदेश सचिव महेश जाधव, गायत्री राऊत, मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर, आसावरी जुगदार, धनश्री तोडकर, सुरेश गुजर, जनार्धन पोवार,संतोष माळी,विजय दरवान,संगीता हुकीरे ,सुशील चव्हाण, उज्वला खोराटे,आनंद कुलकर्णी,सुधीर टिपूगडे, उदय चौगुले,विजया माने,लता मंडलिक,सुवर्णा बोरगावकर,कांचन भांडीग्रे,रूपाली साळोखे,पल्लवी पोवार ,शितल चव्हाण,स्वरूपा पोवार,कविता चव्हाणयांच्यासह परिसरातील महिला आणि विविध तालीम संस्था - तरुण मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .आंदोलनाची दखल घेत तातडीने मिरजकर तिकटी येथील हौदामध्ये पाणी भरण्यासाठी टँकरही आले . .

Comments
Post a Comment