पर्युषण पुर्णाहूतीनिमित्त वरघोडा संपन्न
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर येथील समस्त जैन श्वेतांबर मारवाडी समाजाचा पर्युषण पर्व नुकताच पार पडला,त्या मध्ये अनेक धार्मिक विधी , तप, जप, उपवास पार पडले,पर्युषण पर्व निमित्त आज सकल जैन समाजाच्या वतीने विश्वशांती साठी वरघोडा रथ यात्रा मिरवणूक काढण्यात आली,या मध्ये चांदीच्या रथा मध्ये तिर्थंकर श्री शांतीनाथजी भगवान यांची प्रतिमा होती, तसेच,बैलगाडी मध्ये शहनाई चौघडा, घोडे,आणि बग्गी मध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा घेऊन लाभार्थी परिवार उपस्थित होते.नाशिक ढोल तसेच बँडबाजा यांचा समावेश होता
सदर मिरवणुकीत श्री संभवनाथ जैन मंदिर ट्रस्ट गुजरी,श्री मुनीसुव्रत स्वामी संघ लक्ष्मीपुरी,श्री वासुपूज्य स्वामी संघ महावीर नगर,श्री आशापुरण पार्श्वनाथ संघ,श्री 27 धडा, श्री शत्रुंजय सोसायटी संघ या सर्व संघाचे महावीर स्वामीजीचे पाळणाजी रथा मध्ये समावेश होते.
सदर मिरवणूकीस गुजरी येथील मंदिरापासून प्रारंभ होऊन भेंडे गल्ली, शिवाजी पुतळा ,बिंदू चौक ,लक्ष्मीपुरी मंदिर ,लक्ष्मी रोड, महानगरपालिका, शिवाजी पुतळा , गुजरी रोड मार्गे मंदिरात संपन्न झाली.
सदर मिरवणुकीत परमपूज्य साध्वीजी उत्तमगुणाश्रीजीं,परम पूज्य साध्वीजी तत्वप्रियाश्रीजी यांची निश्रा लाभली.
तसेच सकल् जैन समाजातील श्रावक श्राविका,सर्व मंदिरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्टी, युवक, माता ,भगिनी, सर्व मंडळे आपल्या पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते.
सदर मिरवणूक छत्रपती शिवाजी चौकात येताच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

Comments
Post a Comment