दीड दिवसांच्या श्रीगणेशाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन
कोल्हापूर, २८ सिटी न्यूज नेटवर्क
‘गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’,च्या गजरात साश्रूपूर्ण नयनांनी राज्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या श्रीगणेशाला निरोप दिला. राज्यातील विविध शहरांमधील नद्यांवर, तलावांवर भाविकांनी दुपारपासून विसर्जनासाठी गर्दी केली होती. नदीकिनारी आरती करून, नैवेद्य दाखवून श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापूर शहरात मूर्ती विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने कृत्रिम कुंड उपलब्ध करून दिले होते; मात्र भाविकांनी मोठ्या संख्येने पंचगंगा नदीत, तर सांगलीत कृष्णा नदीतच विसर्जन करण्यास प्राधान्य दिले.

.jpg)
Comments
Post a Comment