महाराष्ट्रातील पहिलीच पर्यावरणपुरक कोल्हापुरातील वरदविनायकाच्या गणेशमूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न


महाराष्ट्रातील पहिलीच पर्यावरणपुरक कोल्हापुरातील वरदविनायकाच्या गणेशमूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न: वरदविनायकाची मूर्ती दर्शनासाठी खुली



कलानगरीतील पर्यावरणपूरक अनोख्या उपक्रमांचे कौतुक


कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी संस्कृतीक मंडळाच्या वतीने यावर्षी पर्यावरणपूरक कायम स्वरूपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला आहे.महाराष्ट्रातील पहिली मूर्ती असुन मूर्तीचा आगमन सोहळा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुर शेती उत्पन्न बाजारसमितीचे सभापती मा श्री सुर्यकांत पाटील यांच्या शुभहस्ते डॉ राहुल पाराशर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री कुमार अहुजा, श्री वैभव सावर्डेकर, श्री विजय कागले,  यांच्या प्रमुख उपस्थित ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत महाआरती करून संपन्न झाला.

 


मूर्तिकार संदीप कातवरे यांचे विशेष कौतुक

मंडळाच्या पुढाकाराने मूर्तिकार श्री संदीप कातवरे यांनी तयार केलेली पर्यावरणपूरक मुर्तीचे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेतून  मूर्तीकार व धान्य व्यापारी मंडळाचे  विशेष कौतुक होत आहे.

       १५० हून अधिक व्यापारी गणेशभक्तांनी एकसारखे ड्रेस परिधान करून निवडणुकीची शोभा वाढवली.मिरवणुकीमध्ये विश्व वारकरी जिल्हाध्यक्ष श्री ओंकार महाराज यांच्या नेतृत्वाखाली ८ ते १५ वर्षा खालील ५५-६०बालकलाकारांनी भाग घेऊन३२-३२ पावलांचे प्रकार, जुगलबंदी प्रकार, मानवी रथ, मानवी गरुड, संगीत खो-खो, अशा अनेक कला सादर वातावरण भक्तीमय  करून टाकले होत.धर्मशिल श्री शंभो ढोल पथकाने मिरवणुकीची रंगत वाढवली.सुप्रसिद्ध महाराष्ट्र बँड यांनी आपली कला  सादर करून धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते पारंपरिक वाद्याच्या गजरात दुपारी ५ वाजून ३१ मिनिटांनी मिरजकर तिकटी येथून आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणूक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड, मिरजकर , तिकटी,  महानगरपालिका, महाराणा प्रतापचौक, मार्गे रात्री ९ :३०लक्ष्मीपुरी गणेश मंदिर येथे विसर्जित झाली.त्यानंतर धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेच्या इमारतीमधील मंदिरामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री महावीर* रामचंद्र मुग व मुग परिवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.  पर्यावरणपूरक  वरदविनायकाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे.गणेश भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव उपाध्यक्ष सागर सन्नकी उत्सवकमिटी उपाध्यक्ष वैभव लाड यांनी केले आहे.

   सामाजिक बांधिलकी

मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी  सांभाळत ज्ञान प्रबोधन भवन संचलित  अंध शाळेतील विद्यार्थ्यांना ११००० रुपयेचा चेक मान्यवरच्या हस्ते सुपूर्त केला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव उपाध्यक्ष सागर सन्नकी खजानिस  विजय कागले सचिव बलराज निकम उत्सव कमिटी उपाध्यक्ष वैभव लाड खजानिस गणेश सन्नकी सचिव राहुल हळदे विशाल कोगनोळे सिद्धार्थ कापसे राजेंद्र लकडे, सुरेश लिंबेकर किशोर तांदळे अमित खटावकर राजेश आवटे यश मकोटे संकेत लिंबेकर संम्मेद तपकिरे सचिन मिठारी श्रेयस मिठारी विशाल घोडके आशिष क्षिरसागर यांच्यासह व्यापारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Comments