दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५




. भाद्रपद शुक्ल पंचमी/षष्ठी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७. संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


चंद्र नक्षत्र - चित्रा/स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ.


"आज उत्तम दिवस आहे." *ऋषीपंचमी, जैन संवत्सरी* 


२८ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उदार आणि निस्वार्थी आहात. शाळा, शैक्षणिक संस्था, दवाखाने या सारख्या सामाजिक संस्थांत काम करणे तुम्हाला मनापासून आवडते. काही वेळी तुमचे वैयकीत आणि सामाजिक जीवनातअडचणी येतात. त्यासाठी तुम्ही योग्य सल्ला घेतला पाहिजे. जीवनाचा साथीदार निवडताना अत्यंत सजग असले पाहिजे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्यात भरपूर उत्साह आहे. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार करत नाहीत. तुम्ही यशस्वी, प्रामाणिक आहेत. मात्रतुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. बोलण्यापेक्षा लेखनातून तुम्हीं अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि ज्ञानामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. वडील, सासरे, बायको, आई इत्यादी नातेवाईकांच्या मुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. वयाच्या 46 व्या वर्षापासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि तुम्हाला धंद्यातही यश मिळते. तुम्ही प्रामाणिक आहात. स्वतःच्या विचारशक्तीमुळे आणि स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा कधी कधी अपकर्ती देखील होऊ शकते. तुमचे आरोग्य चांगले असते आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे होतात. तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. मात्र तुम्हाला तसेच सहकार्य मिळेलच असे नाही. तुम्ही अत्यंत कल्पक, चपळ, उत्साही आणि कला प्रिय आहात. तुम्हाला निसर्गाची आवड आहे. जीवनातला आनंद तुम्ही उपभोगत असतात. तुमचा स्वभाव काहीसा संशयी आहे आणि निर्णय घेण्यास तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही समाजाच्या सर्व थरामध्ये सहज मिसळू शकतात. अनेकदा तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. बऱ्याच विषयाचे तुम्हाला चटकन आकलन होते. तुम्ही बुद्धिमान आहात आणि सभा संमेलना तुम्ही गाजवू शकतात. तुमची इच्छा शक्ती जबरदस्त आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. तुम्ही आशावादी असतात. कधी कधी तुम्ही अधिक काटकसरी आणि व्यवहारिक होतात. दुराग्रही स्वभाव, इतरांवर टीका करणे आणि त्यांचे दोष दाखवणे तुम्ही टाळले पाहजे.

सहभाग नोंदवा


व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.


शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.


शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


मेष:- चंद्राचा रवीशी लाभ योग तर शुक्राशी केंद्र योग आहे. अनुकूल दिवस आहे. व्यापार वाढेल. सरकारी कामात प्रगती होईल. प्रतिष्ठा प्राप्त होईल. यशश्री मिळेल. घराच्या कामासाठी खर्च वाढेल.   

     

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. संभ्रम दूर होतील. मार्ग सापडेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. कलाकारांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. 

 

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. व्यवसाय वाढतील. अधिकार वाढतील. पराक्रम गाजवाल. विनाकारण वाद टाळा.


कर्क:- लहान प्रवास घडतील. जलपर्यटन घडेल. मित्र मंडळी भेटतील. नवीन ओळखी होतील. आरोग्य सांभाळावे लागेल. नैतिकता सोडू नका.

 

सिंह:- राशीस्वामी खुश आहेत. तुमच्यातील नेतृत्वगुण आज प्रकर्षाने बाहेर येतील. सर्वार्थाने आनंदी दिवस आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. खर्चात मात्र वाढ होऊ शकते.  

  

कन्या:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नातेवाईकांमुळे लाभ होईल. महिलांशी वागताना सभ्यता ठेवा. कठोर निर्णय घ्यावे लागतील. 

 

तुळ:- कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मेजवानी मिळेल. वरिष्ठ खुश राहतील.   

 

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी अनुकूल नाही. दुपारनंतर फरक पडेल. भागीदारी व्यवसायात वाद होऊ शकतात. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.  


धनु:- कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल.

 

मकर:- अनुकूल ग्रहमान आहे. सुरुवातीला चांगले अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. अपेक्षित यश मिळणार नाही. पत्नीच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. 

 

कुंभ:- नवम स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. अधिकार वढतील. प्रतिष्ठा मिळेल. दबदबा वाढेल. शत्रू पराभूत होतील.

 

मीन:- संमिश्र ग्रहमान आहे. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. सरकारी कामात वाद होऊ शकतात. अंत:प्रेरणा काय सांगते आहे ते ऐका. उपासना करा. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments