धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या देखाव्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन
धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाच्या दर्शन देखाव्याचे पालकमंत्री नामदार श्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
४५ वर्षाची परंपरा असणाऱ्या कोल्हापूरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी पर्यावरणपुरक कायम स्वरूपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. गुरुवार दि २८/०८/२०२५ रोजी पर्यावरणपुरक गणरायाच्या मूर्तीच्यादर्शन देखाव्याचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मा. श्री राजेश क्षीरसागर तसेच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा श्री अमल महाडिक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शानदार उद्घाटन झाले.
धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळ वतीने लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील मंडपामध्ये आजपासून ही गणेशमूर्ती गणेशभक्तासाठी दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे.धान्य व्यापारी आपल्या व्यवसायातून वेळ देऊन अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवतात त्याबद्दल पालकमंत्री नामदार श्री प्रकाश आबिटकर यांनी कौतुक केले. मुर्तीकार श्री संदिप कातवरे यांच्यासह अनेक देणगीदाराचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पर्यावरण पुरक गणेशमूर्तींचे दर्शन कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम गणेशभक्तांनी घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजी यादव उपाध्यक्ष श्री सागर सन्नकी खाजानिस विजय कागले सचिव बलराज निकम यांनी केले आहे.
यावेळी बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष श्री वैभव सावर्डेकर बालकल्याण संस्थेची संचालक विवेक शेटे, श्री संतोष लाड , अमर क्षिरसागर, नगरसेवक श्री शारंगधर देशमुख , रमेश पोवार मंडळाच्या उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष वैभव लाड खजानिस गणेश सन्नकी सचिव राहुल हळदे विशाल कोगनोळे सिद्धार्थ कापसे राजेंद्र लकडे, सुरेश लिंबेकर किशोर तांदळे अमित खटावकर राजेश
आवटे, सुभाष अथणे, चंद्रकांत हिरेमठ, यश मकोटे, संकेत लिंबेकर संम्मेद तपकिरे सचिन मिठारी श्रेयस मिठारी विशाल घोडके आशिष क्षिरसागर विनोद सावर्डेकर यांच्यासह व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment