रिलायन्स जीओकडून 'स्वछता ही सेवा' 2025 अभियानाचे आयोजन

 रिलायन्स जीओकडून 'स्वछता ही सेवा' 2025 अभियानाचे आयोजन 


कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स फाउंडेशन च्या पुढाकाराने रिलायन्स जिओ च्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन केले गेले . शनिवार 27 सप्टेंबर रोजी जिओ च्या कर्मचाऱ्यांनी राज्यातील सर्व शहरांमध्ये हे अभियान राबविले . एकत्रितपणे एकाच दिवशी विविध उद्याने, सार्वजनिक ठिकाणे , कार्यालय परिसराची स्वछता करून स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली . 

 


या स्वच्छता मोहिमेमध्ये जिओचे महाराष्ट्र कार्यालय, नागपूर , नाशिक , छत्रपती संभाजीनगर , कोल्हापूर येथील क्षेत्रीय कार्यालये तसेच महाराष्ट्रातील 89 जिओ सेंटर मधील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला . यावेळी शेकडो किलो प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा करण्यात आला .

Comments