पूरग्रस्तांच्या मदतीचा पहिला ट्रक उद्या सोमवारी धाराशिवला रवाना होणार....
आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत, पूरग्रस्तांच्यासाठी जमा झालेल्या मदतीची घेतली माहिती...
खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीचा ट्रक धाराशिवला जाणार...
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केलाय. त्यानुसार जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये पूरग्रस्तांच्याकरिता मदत संकलित करण्यात येत असून, आज पाचव्या दिवशीही मदतीचा ओघ सुरू होता. 24 सप्टेंबर पासून पूरग्रस्तांच्यासाठी ही मदत संकलित करण्यात येत आहे. या ठिकाणी आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली. गेल्या चार दिवसापासून पूरग्रस्तांच्या करिता जी मदत संकलित झाली होती, त्याबाबतची माहिती त्यांनी घेतली. ही मदत एकत्रितरित्या एका ट्रक मधून पूरग्रस्तांच्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरातील काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जाणार आहेत. यांशिवाय पूरग्रस्तांच्यासाठी जमा झालेले धान्य त्याच पॅकिंग त्याचबरोबर, जीवनावश्यक वस्तूंचे तयार करण्यात आलेले किट याबाबत त्यांनी माहिती घेऊन सूचना केल्या. उद्या सोमवारी 29 सप्टेंबरला ही मदत धाराशिव जिल्हयात पाठवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे 25 कार्यकर्ते देखील जाणार आहेत. खासदार शाहू महाराजांच्या उपस्थित उद्या 12 वाजता मदतीचा ट्रक धाराशिवला जाणारं असून. कोल्हापूरकरांनी जे दातृत्व दाखवलं त्याबद्दल देखील आमदार सतेज पाटील यांनी ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांच्यासाठी मदतीचा हात दिला त्यांच्या प्रती आभार व्यक्त केल.

Comments
Post a Comment