विहिप - मातृशक्ती - दुर्गा वाहिनी आयोजित कुंकूमार्चन सोहळ्यात सव्वाशे महिला - युवतीचा सहभाग
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
नवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषद - मातृशक्ती - दुर्गा वाहिनी आयोजित बिनखांबी गणेश मंदिराशेजारील मंगलधाम मध्ये संपन्न झालेल्या ‘कुंकूमार्चन सोहळ्या’ त पंचक्रोशीतील सव्वाशे महिला सहभागी झाल्या होत्या. सर्व सहभागी कुंकू - पादुका सह पूजा साहित्य देण्यात आले
प्रारंभी सर्वाचे स्वागत करताना आश्विनी ढेरे नवरात्रीच्या पावन पर्वावर मातृशक्ती एकत्र येऊन सामूहिकरित्या देवी उपासना आणि परंपरागत रितीरिवाजांनी साजरा होणारा हा सोहळा श्रद्धा आणि ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे ' असा आशावाद व्यक्त केला .महिलांनी आणि युवतीने आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी लाठी - काठी प्रशिक्षण अवश्य करावे असे आवाहन यावेळी जान्हवी पाटील यांनी केले .त्यांच्यासह जिल्हा मंत्री विनय बारड, उपाध्यक्ष शांतीलाल लिंबानी यांच्या हस्ते प्रारंभी शस्त्र पूजन करण्यात आले .यानंतर महालक्ष्मी देवी च्या एक हजार आठ नावाचे आणि श्री सुक्ता चे श्वेता कुलकर्णी यांनी पठण केले .
या कुंकूमार्चन सोहळा यशस्वी होण्यासाठी संयोजिका अश्विनी ढेरे सह तेजश्री जोशी, तसेच विहिप जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील,श्रीकांत पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तेजश्री जोशी ,बजरंग दल संयोजक सोहम कुराडे तेजश्री जोशी , आरोग्य मित्र राजेद्र मकोटे ,सुनील ठाकूर भास्कर कोरवी सह दुर्गा वाहिनी - बजरंगी कार्यरत होते . शिये - उचगांव साने गुरुजी वसाहत कसबा बावडा शाहूपुरी राजारामपुरी शिवाजी पेठ येथील महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या .

Comments
Post a Comment