"गोकुळ" कडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट

 "गोकुळ" कडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट

तब्बल १३६ कोटीचा फरक जमा होणार , चेअरमन नाविद मुश्रीफ यांची माहिती 


कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी खरी अर्थवाहिनी आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणे, सभासदहिताच्या विविध योजना राबविणे, काटकसरीचा कारभार, प्रभावी प्रशासन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ या माध्यमातून गोकुळने सातत्याने प्रगती साधली आहे. 



दूध उत्पादकांच्या श्रमांचा सन्मान राखत आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध राहत गोकुळ दूध संघाने यंदाही दिवाळीपूर्वी दर फरकाचा मोठा निर्णय घेतला आहे. गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही अंतिम दूध दर फरकाचा लाभ मिळणार असून, तब्बल १३६ कोटी ०३ लाख रुपयांची उच्चांकी रक्कम दि ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती आज गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.


.ही रक्कम गत वर्षीच्या तुलनेत २२ कोटी ३७ लाखांनी अधिक आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी गोकुळ संलग्न सुमारे ५ लाख ८ उत्पादक सभासदांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे.



दर फरकाचे तपशील : दि.०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या कालवधीत दूध पुरवठा केलेल्या

म्हैस दूध उत्पादकांना सरासरी प्रतिलिटर २ रु. ४५ पैसे,

गायीचे दूध उत्पादकांना सरासरी प्रतिलिटर १ रु. ४५ पैसे, अंतिम दूध दर फरक दिला जाणार आहे.

प्राथमिक दूध संस्थांसाठी प्रतिलिटर सरासरी १ रु. २५ पैसे डिबेंचर पोटी गोकुळ कडे जमा करण्यात येणार आहे.

हीरक महोत्सवी विशेष दर फरक म्हैस व गाय दोन्हीकरिता प्रतिलिटर २० पैसे देण्यात आला असून तो वरील दर फरका मध्ये समाविष्ठ आहे. यामुळे उत्पादकांना आणि संस्थांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे.

दर फरकाची विभागणी :

म्हैस दूधाकरिता : ६६ कोटी ३७ लाख ७० हजार रुपये

गायीचे दूधाकरिता : ४५ कोटी १४ लाख ८ हजार रुपये

दर फरकावरील व्याज (६%) : ५ कोटी ५२ लाख ८९ हजार रुपये

डिबेंचर व्याज (७.८०%) : १० कोटी ६७ लाख ३५ हजार रुपये

शेअर भांडवलावरील डिव्हिडंड (११%) : ८ कोटी ३८ लाख ६९ हजार रुपये

एकूण १३६ कोटी २३ लाख रुपये. 

गोकुळच्या भविष्यातील योजना 

. आईस्क्रिम व चीज तसेच गुलाब जामन या सारखे उत्पादन व विक्री सुरू करणे


२. सिताफळ, अंजीर व गुलकंद बासुंदी उत्पादन ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन बासुंदीच्या नवीन प्रकारांचे उत्पादन व विक्री.


३. नवी मुंबई (वाशी शाखा) आणि पुणे शाखेसाठी योग्य जागा खरेदी करणे


४. यही प्रोजेक्ट बाशी नवी मुंबई येथे अंतिम टप्पात आले आहे.


५. वासरू संगोपन केंद्राद्वारे ५०० वासरे तयार करणे भविष्यातील योजना व सुधारणा


६. सी.एन.जी. पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी भविष्यातील वाहनांवरील खर्च कमी करणे व पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढविण्यासाठी.


७. जुनी दूध तपासणी मिल्को टेस्टर / मिल्क अनालायझार मशिन बायबॅक योजना संस्थांमध्ये जुनी मशिन येऊन त्यांना बायबैंक पद्धतीने नवीन उच्च दर्जाची मशिन पुरवणे.


८. ओला चारा व वाळलेला चारा मिश्रित 'आयडीयल टी.एम.आर.' उत्पादन दूध उत्पादकांना उच्च दर्जाचे, पोषक व मिश्रित चारा पुरवणे.


९. लहान व अल्पभूधारक उत्पादकांसाठी कमी किंमतीचे नवीन २ एच.पी. न्यु मॉडेल चाफकटर तयार -लवकरच उपलब्ध होणार


१०. "महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन" गाभण काळातील (शेवटचे २-३ महिने) गायी-म्हशींसाठी विशेष खाद्य, उद्दिष्ट अधिक दूध उत्पादन व उत्कृष्ट गुणवत्ता. लवकरच उपलब्ध होणार.


११. रेडया संगोपन, म्हैस खरेदी अनुदान व वैरण विकास रेडया संगोपन केंद्र (Heifer Rearing Centre) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत गोकुळमार्फत ५०० रेडयांचे संगोपन करणारे केंद्र लवकरच सुरू होणार, येथे रेडयांना आय. व्ही.एफ. व सेक्स सेल विर्यमात्रा वापरून गाभण केले जाईल. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना उच्च वंशावळीची जनावरे माफक दरात उपलब्ध होणार,


संचालक मंडळ व व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे गोकुळने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. आगामी काळात २० लाख लिटर टप्पा पार करून २५ लाख लिटर संकलन करणे म्हैस दूध संकलन वाढवणे आणि उत्पादकांना जास्तीत जास्त दर देणे हे गोकुळचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नाविद मुश्रीफ यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला चेअरमन नाविद मुश्रीफ सह , माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक विश्वास पाटील , अरुण डोंगळे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.



Comments