दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५.






 अश्विन शुक्ल अष्टमी. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.


आज चांगला दिवस आहे. *दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास* 


चंद्रनक्षत्र - पू. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु. 


३० सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रात तुम्ही चमक दाखवतात. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. कृतिशील असूनही तुम्ही अस्वस्थ असतात. तुमच्यात अभिमान आणि तपस्या आहे. धर्मादाय संस्थांमध्ये तुमचा संबंध येतो. वयाच्या ३० नंतर भाग्योदय होतो. क्लब्ज, सिनेमा, नाटक, प्रवास यांची आवड असते. कला आणि संगीत तसेच गृह सजावट यांची आवड असते. तुम्ही प्रेमळ असून अपत्यांबद्दल विशेष प्रेम असते. तुमचा उत्साह दांडगा असतो. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असून लोकांना मोहित करू शकतात. पुरुष व स्त्रिया या दोघांमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित संपत्तीत तुम्हाला वाटा मिळतो. आध्यत्मिक वृत्ती असते. इतरांना तुम्ही योग्य सल्ला देतात. आयुष्यात उशिरा प्रसिद्धी आणि मन सन्मान मिळतात. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे असतो. इतरांचे बारीक दोष तुम्ही सहजगत्या काढू शकतात. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. इतरांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडतात. तुमच्यात अति महत्वाकांक्षा असते. जास्त बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. अनाठायी काळजी कर्णयचा तुमचा स्वभाव असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.



व्यवसाय:- राजकीय नेते, न्यायाधीश, सचिव, धार्मिक शिक्षक, डॉक्टर, केमिस्ट, शैक्षणिक क्षेत्र.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.


शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. प्रेमात यश मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. भौतिक सुखे मिळतील. वाहन खरेदी होईल. छोट्या सहली घडतील. मात्र परक्या महिलांचा गैरसमज होऊ शकतो.  

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. गृह सजावट कराल. काही महत्वाचे बदल घडतील. स्त्री धन वाढेल. सामाजिक कार्यातून नावलौकिक वाढेल.  

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कलाकारांना चांगला दिवस आहे. संगीत, वाद्य यात रममाण व्हाल. पत्नीसाठी वेळ द्याल. महिलांना भेटवस्तू मिळतील. शत्रूचा त्रास कमी होईल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यवसाय आणि उद्योगात भरभराट होईल. कामाचा ताण वाढेल मात्र आज अधिक फायदा होणार आहे. गोड बोलण्याने कामे पूर्ण होतील. व्यसने टाळा.   

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज प्रणयरम्य दिवस आहे. प्रिय व्यक्तीसोबत सहल घडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. पित्याकडून लाभ होतील. संपत्ती वाढेल. मन आनंदी राहील.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. मौल्यवान खरेदी होईल. हितशत्रू माघार घेतील. सरकारी कामे पूर्ण होतील. चिकित्सा आणि संशोधन यात यश मिळेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यावसायिक यश देणारा दिवस आहे. नवनवीन संकल्पना राबवल्या जातील. व्यवसायात काही बदल कराल. तुम्ही मूलतः सभ्य आणि सुसंस्कृत आहात तरीही स्वतःमध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. भिन्न लिंगी व्यक्तीकडून कौतुक होईल.    

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाच्या ठिकाणी आज मन रमेल. महिला सहकारी कडून उत्तम सहकार्य मिळेल. सौंदर्यप्रसाधने, सुवासीके यांच्या व्यापारात भरपूर फायदा होईल. वाहन खरेदी होऊ शकते.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तुमच्या राशीत चन्द्र आहे. कुलदेवता प्रसन्न होईल. उपासना फळास येईल. सहल घडेल. परदेश गमनाचे बेत आखले जातील. स्वप्नपूर्ती होईल.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही ग्रहमान अनुकूल आहे. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. पत्नीच्या माहेरकडून लाभ होऊ शकतात. लॉटरी लागण्याचे योग आहेत. शेअर्स मध्ये अंदाज अचूक ठरतील.    


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आज कामे पूर्ण करा. कुटुंबासाठी वेळ द्याल. प्रिय व्यक्तीची संवाद होईल. महिलांकडून विरोध होऊ शकतो. मात्र तुमच्या मिश्किल स्वभावाने तुम्ही यावर सहज मात कराल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुम्ही बरेच दिवस स्वतःवर नियंत्रण ठेवले आहे. मात्र आज तुमचा संयम संपू शकतो. काही प्रलोभने समोर येतील. कामाच्या तणावात वेळ कमी पडेल. व्यवसाय वाढेल.   


-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments