दीपावली_पाडव्यानिमित्त कोल्हापुरात सजवलेल्या म्हशींचा रोड शो..
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
बळीराजाला आणि गवळी समाज बांधव तसेच म्हैस धारकांना साथ देणाऱ्या म्हैशी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जनावर म्हणजे फक्त उपयोगी प्राणी नाही, त्या सामाजिक जीवनाचा भाग आहेत म्हणून त्यांना साज-शृंगार दिला जातो.
दरवर्षी दीपावली पाडव्यानिमित्त म्हशीना सुशोभित करून सजवलेल्या म्हशींचा रोड-शो आयोजित करण्यात येतो.
याहिवर्षी आयोजित सदर उपक्रमानिमित्ताने पंचगंगा नदी येथे भेट देऊन गवळी समाज बांधव आणि म्हैस धारकांच्या आनंद उत्सवात सहभाग घेतला तसेच याप्रसंगी यामाहा गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरार अनुभवला. तसेच या प्रसंगी उपस्थित समाज बांधव आणि नागरिकांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या..

Comments
Post a Comment