राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करावा : आमदार सतेज पाटील

 राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करावा : आमदार सतेज पाटील    



कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करावा अश्या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आम सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने दिले.

 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक व शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पशुहानी, मनुष्यहानी, घरे व जनावरांच्या गोठ्यांची पडझड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. अतिवृष्टीने बाधितांच्या मदतीकरीता शासनाने जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येवून वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहिर केलेली आहे. 

सदर शासन निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून एकमेव गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. परंतू जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत झालेल्या पंचनाम्यानुसार जून 2025 ते  ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडहिंग्लज तालुक्यातील 17 गावांमधील 319 शेतकऱ्यांच्या एकूण 190 हेक्टरमधील भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग, भाजीपाली, फळपिके, फुलपिके आदी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पशुहानी, घरांची तसेच जनावरांच्या गोठ्यांची पडझड आदी नुकसानही झालेले आहे. तरी देखील सदर शासन निर्णयामध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नसल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये असंतोष व नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. 

तरी राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करावा असे निवेदन दिले.

        

यावेळी सुनिल शिंत्रे, जिल्हाप्रमुख शिवसेना, अमर चव्हाण,कॉम्रेट संपत देसाई, सोमगोंडा , प्रशांत देसाई, बसवराज आजरी, गणेश कुरुंदकर, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

Comments