दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

🌞 बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५






🗓️ कार्तिक शुक्ल सप्तमी

📅 विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१

🌙 आज चंद्र मकर राशीत उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्रात संचार करीत आहे. (धृती योग आणि विष्टी करण शांती)


🪔 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 (संपर्क – 8087520521)


राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०


आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे.


♈ मेष


आजचा दिवस जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त जाईल. वरिष्ठांचा सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.


♉ वृषभ


नवीन संधी समोर येतील. आत्मविश्वास ठेवा, यश तुमच्याच पावलावर येईल. नातेसंबंधात सौहार्द राहील. विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग खुला होईल.


♊ मिथुन


आज संयम आवश्यक आहे. बोलताना जपून बोला. कुटुंबात थोडे मतभेद संभवतात. आर्थिक निर्णय पुढे ढकला. संध्याकाळी समाधान लाभेल.


♋ कर्क


कामात स्थैर्य येईल. आरोग्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीकडून आनंददायक बातमी मिळेल. नवीन योजना राबविण्यासाठी शुभ दिवस.


♌ सिंह


अचानक प्रवासाची शक्यता आहे. व्यवसायिक कामात सावधगिरी बाळगा. वरिष्ठांशी मतभेद टाळा. संध्याकाळी ताण कमी होईल.


♍ कन्या


महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक दृष्ट्या लाभदायक वेळ. सर्जनशील कामात प्रगती होईल.


♎ तुला


घरगुती कामात व्यस्त राहाल. भावनिक निर्णयांपासून दूर रहा. आरोग्याकडे लक्ष द्या. दुपारी मानसिक स्थैर्य लाभेल.


♏ वृश्चिक


तुमच्या शब्दांना आज विशेष महत्त्व असेल. कामात प्रगती दिसून येईल. प्रवास यशस्वी ठरेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.


♐ धनु


आजचा दिवस उत्साही असेल. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. नोकरीत बढतीची शक्यता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


♑ मकर


चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. कामात स्वतःचा ठसा उमटवाल. आरोग्य चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल.


♒ कुंभ


आज एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. गुप्त शत्रूंनी त्रास देण्याची शक्यता. संयम ठेवा. अध्यात्मिक साधनेतून मनःशांती मिळेल.


♓ मीन


मित्रांकडून सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. नव्या उपक्रमाला शुभारंभ करण्यास योग्य दिवस.


🪔 दिवस शुभ असेल – मकर, धनु, वृषभ, आणि कन्या राशींसाठी.

🌿 आजचा मंत्र: “ॐ नमः शिवाय”

🕉️ शुभ रंग: हिरवा

📿 शुभ अंक: ३


ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

Comments