रविवारी १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धा



रविवारी(दि.२६) १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ   स्पर्धा  



कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क 

रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी एक दिवशी सोळा वर्षाखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अनुज् चेस ॲकॅडमीच्या वतीने १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 रविवार, दि. 26 ऑक्टोबर रोजी मुरगूड विद्यालय (ज्यू कॉलेज), मुरगूड (नवीन हॉल) येथे ही स्पर्धा होईल. स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटातील सर्व मुलांची एकत्रित एकच स्पर्धा होईल. (जन्म तारीख : १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर), इतर वयोगटात बक्षिसे १४ वर्षांखालील (१/१/२०११ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१३ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१५ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१७ किंवा त्यानंतर). दि. 25 ऑक्टोबर पर्यंत सहभाग नोंदवावा. 

स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक, टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), संदीप सारंग (९६७३१६५९६७), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), अनुष्का पाटील यांनी केले आहे.

Comments