बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या दुस-या शाखेचा आज होणार उद्घाटन समारंभ
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
आपल्या चटकदार व्हेज डिशेस आणि थाळीच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून लोकांना सेवा देत असलेले दसरा चौक येथे प्रथम सुरू करण्यात आलेल्या बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटने १५ वर्ष पूर्ण केली आहेत. या रेस्टॉरंटच्या चवदार जेवणाची मेजवानी आता कोल्हापूरकरांना दुसऱ्या शाखेच्या माध्यमातून रंकाळा, फुलेवाडी सोबतच आजूबाजूच्या ठिकाणच्या ग्राहकांना वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची चव अनुभवायला आणि चाखायला मिळणार आहे.
बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटची दुसरी शाखा ही फुलेवाडी दत्त मंदिर येथे सुरू होत असून गुरूवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी के. एम. पी. हॉटेलिअर्सचे शुध्द शाकाहारी "बांसुरी फाईन डाईन" हे नूतन भव्य रेस्टॉरंट सुरू होत आहे आणि या रेस्टॉरंटचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते करण्याचे योजिले आहे. तसेच हॉटेल मालक संघ अध्यक्ष - श्री. सचिन शानभाग, उपाध्यक्ष श्री सिध्दार्थ लाटकर, माजी अध्यक्ष श्री उज्वल नागेशकर, माजी अध्यक्ष श्री आनंद माने, चेंबर ऑफ कॉमर्स, किडाई अध्यक्ष श्री. के. पी. खोत आणि भारतीय क्रिकेटपटू श्री. केदार जाधव यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
याठिकाणी व्हेजमध्ये पंजाबी , महाराष्टीयन, थाळी, तंदूर, चायनीज,कॉन्टिनेन्टल,डेझर्टस अशा पद्धतीचे जेवण ग्राहकांना मिळणार आहे. अत्यंत माफक दरात कोल्हापूरकरांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ए.सी. व ओपन गार्डन मध्ये ही कुटुंबासहीत जेवणाचा स्वाद सोबत आनंदही घेता येणार आहे. तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना व वाढदिवस आणि ऑफिशियल कॉन्फरन्ससाठी एसी हॉलची सुविधा रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहे.
या रेस्टॉरंटमध्ये ए.सी, ओपन गार्डनची सोय, एसी बँक्वेट हॉल,चेंजिग रूम/फीडिंग रूम आदी सुविधा उपलब्ध आहेत.सर्वांना परवडेल असे हे रेस्टॉरंट ३१ ऑक्टोबर २०२५ पासून ग्राहकांसाठी खुले होणार असून, कोल्हापूरकरांनी बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेला अवश्य भेट द्यावी असे बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या टीमकडून सौ.अनुजा मेहेंदळे यांनी आवाहन केले आहे. यावेळी रेस्टॉरंटचे भागीदार श्री.महेश पोवार, श्री.विश्वास कळके, श्री. धर्मेश मेहेंदळे, सौ.दिपाली पोवार आदी उपस्थित होते.


Comments
Post a Comment