दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुळ व भाजीपाल्याचे सौदे — नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते शुभारंभ

 दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुळ व भाजीपाल्याचे सौदे — नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते शुभारंभ



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज कोल्हापूर बाजार समितीत गुळ व भाजीपाल्याचे सौदे उत्साहात पार पडले. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष मा. नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते या व्यवहारांचा शुभारंभ झाला.

आज गुळाचा दर ₹३७०० ते ₹५०५० प्रति क्विंटल इतका नोंदविण्यात आला असून, एकूण ५५,१४६ गुळ रव्यांची उच्चांकी विक्री झाली. तसेच गुळाचे बॉक्स ₹३८०० ते ₹४९०० प्रति क्विंटल दराने विकले गेले व एकूण ३६,६८० बॉक्स विक्री झाली.

या कार्यक्रमानिमित्त संतोष ट्रेडिंग कंपनी (कमिशन एजंट) या नवीन भाजीपाला दुकानाचे उद्घाटनही मा. नविद मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनानंतर कोथिंबीरचा लिलाव विक्री सौदा शेकडा ₹२१००/- या उच्चांकी दराने झाला.


या प्रसंगी बाजार समितीचे सभापती श्री. सूर्यकांत पाटील यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले की, "आपला शेतीमाल थेट बाजार समितीच्या आवारात आणून विकावा, जेणेकरून योग्य दर मिळेल आणि व्यवहारात पारदर्शकता राहील."

यावेळी उपसभापती राजाराम चव्हाण, संचालक प्रकाश देसाई, भारत पाटील आदी उपस्थित होते 

Comments