दैनिक राशिभविष्य
🌞 बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५.
मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी. शके १९४७, संवत २०८१.
आज उत्तम दिवस आहे. *चंपाषष्ठी.*
🌙 चंद्र – मकर.
⭐ नक्षत्र – श्रवण (पूर्वार्ध), ☀️ योग – शुभ कार्यांसाठी अनुकूल
आजचा दिवस बदल, प्रगती, निर्णयक्षमता आणि सामाजिक संपर्क वाढवणारा आहे. विचारांमध्ये स्वातंत्र्य, नवे मार्ग आणि अचानक संधी मिळण्याची शक्यता.
♈ मेष
कामात जलद गतीने प्रगती. वरिष्ठांचे सहकार्य. आर्थिक लाभाची शक्यता. प्रवास योग चांगला.
♉ वृषभ
नव्या संधी येतील. व्यावसायिक निर्णय फायदेशीर. कुटुंबात सौख्य. आरोग्य उत्तम.
♊ मिथुन
दुपारनंतर महत्त्वाची चांगली बातमी येऊ शकते. परदेशाशी संबंधित कार्यात प्रगती. मित्रांशी सुसंवाद.
♋ कर्क
घरगुती वातावरणात आनंद. तणाव कमी होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. जिद्दीने काम पूर्ण कराल.
♌ सिंह
भागीदारीत लाभ. नाव-कीर्ती वाढेल. सरकारी कामात यश. खर्च नियंत्रणात ठेवा.
![]() |
♍ कन्या
तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता. आरोग्य सुधारेल. घरात शुभकार्याची चर्चा.
♎ तुळ
दुपारनंतर सर्जनशील कामात मोठे यश. मुलांच्या प्रगतीची बातमी. आर्थिक लाभ.
♏ वृश्चिक
मन स्थिर राहील. मालमत्ता विषयक निर्णय फायदेशीर. नातेसंबंधांमध्ये शांतता.
♐ धनु
नवीन करार, नवीन काम आणि अनपेक्षित लाभ. प्रवास योग शुभ. कामात प्रतिष्ठा वाढेल.
♑ मकर
चंद्र राशीतील प्रभावामुळे दिवस उत्तम. आर्थिक लाभ. नेतृत्वाचे गुण दिसून येतील.
♒ कुंभ
दुपारनंतर तुमच्यासाठी मोठा लाभदायी काळ. अचानक संधी. नोकरी/बिझनेसमध्ये वाढ.
♓ मीन
व्यावहारिक निर्णय घ्याल. पैशांची आवक वाढेल. अध्यात्मिक रुची वाढेल. मानसिक शांतता.
-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.




Comments
Post a Comment